Fr Bolmax Pereira Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira: कॅथलिक युवकांचे फादर बोलमॅक्स यांना समर्थन; वास्को चर्चबाहेरील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल

गुन्‍हा दाखल; परेरांनी माफीही मागितली

गोमंतक ऑनलाईन टीम

Fr Bolmax Pereira: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटना चिखलीतील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांच्‍या विरोधात आक्रमक झाल्या.

शुक्रवारी रात्री वास्‍को पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदु समुदायाने गर्दी केली होती. दरम्यान, एकीकडे वास्को पोलिस स्टेशनबाहेर ही गर्दी असतानाच दुसरीकडे वास्को चर्चबाहेर कॅथलिक युवक-युवतीदेखील फादर बोलमॅक्स यांच्या समर्थनाथ जमले होते.

चर्चबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या कॅथलिक युवक-युवतींनी मोबाईलच्या फ्लॅश लाईट्स लाऊन फादर बोलमॅक्स परेरा यांच्या समर्थनाथ धार्मिक गीतांचे गायनही केले. याचा व्हिडिओ शनिवारी सकाळपासूनच व्हायरल झाला होता.

काय आहे प्रकरण फादर परेरा यांनी शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत, पण देव नाहीत. हिंदु लोकांनी त्यांना देव केले आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून हिंदुंच्या भावना दुखवल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी वास्‍को पोलिस ठाण्‍याबाहेर बोलमॅक्स यांच्या अटकेसाठी निदर्शने केली होती.

त्‍यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर परेरा यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परेरा यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो, अशा शब्दात माफी मागितलीही होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT