Casino Dainik Gomantak
गोवा

कॅसिनोमुळे वेश्‍‍या व्‍यवसाय, दारु या वाईट वृत्ती फोफावतात; सनबर्ननंतर दक्षिण गोव्‍यात आता कॅसिनोला विरोध

South Goa: कॅसिनो संस्‍कृती ही अशी एक घातक संस्‍कृती आहे की, तिच्‍या पाठोपाठ वेश्‍‍या व्‍यवसाय आणि दारू या दोन वाईट वृत्ती फोफावतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कॅसिनोमुळे कोणत्‍या वाईट गोष्‍टी राज्‍यात शिरकाव करतात, हे आम्‍हाला पणजीतील कॅसिनोमुळे कळून चुकले आहे. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यात आम्‍ही अशा कॅसिनो संस्‍कृतीला कुठल्‍याही परिस्‍थितीत थारा देणार नाही.

दक्षिण गोव्‍यात ऑफ शाेअर कॅसिनो आणण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास आम्‍ही त्‍याला कडाडून विरोध करू, अशी प्रतिक्रिया बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केली.

दक्षिण गोव्‍यातील साळ नदीत ऑफ शाेअर कॅसिनो सुरू करणार, अशा आशयाचे सध्‍या वृत्त पर्यटन व्‍यवसाय क्षेत्रात पसरलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर व्‍हिएगस यांचे मत विचारले असता, माझ्‍या बाणावली मतदारसंघात जर कुठलाही ऑफ शोअर कॅसिनो आणत असल्‍यास त्‍याला माझा विरोधच असेल.

कॅसिनो संस्‍कृती ही अशी एक घातक संस्‍कृती आहे की, तिच्‍या पाठोपाठ वेश्‍‍या व्‍यवसाय आणि दारू या दोन वाईट वृत्ती फोफावतात. ज्‍यामुळे त्‍या भागातील तरुण पिढी बरबाद होऊ शकते. आम्‍हाला आमची तरुण पिढी बरबाद करायची नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT