Cashew Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: काजू बियांवर खेत्यांचा डल्ला

Goa Farming: शेतकरी हतबल : प्रति किलो 200 रु. दर देण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Farming:

पद्माकर केळकर

बागायतीतील केळी, नारळ, अननस, सुपारी पिकानंतर आता खेती (माकडे) या रानटी प्राण्याने काजू पिकावर हल्ला चढवला आहे. आधीच काजू बियांना प्रति किलो रु. १११ असा अल्प दर आहे, त्यात खेत्यांकडून काजू बियांची होणारी प्रचंड नासाडी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

खेती काजू बिया फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. नुकताच काजू हंगामाला सुरवात झाली असताना खेत्यांनी या पिकाला लक्ष बनवले आहे. नगरगाव, धावे, उस्ते, तार अशा अनेक भागातील काजू बागायतीत फिरल्यास खेत्यांनी काजू बिया खाऊन त्याची टरफले जमिनींवर पडलेली दिसत आहेत. याचा मोठा फटका बसणार असून यंदा काजू उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच काजू बियांचा दर प्रती किलो १११ रुपये असा अत्यल्प असल्याने काजू उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. हा दर न वाढल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. सद्यःस्थिती २०० रुपये प्रती किलो दर आवश्‍यक आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हमीभावच महत्त्वाचा...

काजू बियांना प्रति किलोमागे पंधरा ते वीस रुपये त्यावेळच्या दरानुसार आधारभूत किंमत दिली जाते. याचाच फायदा घेऊन काही काजू कारखानदार हा दर कमी करून लूट करतात. त्यासाठी सरकारने प्रती किलो २०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

काजू आयात धोरण बदला

गोव्यात ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशातून मोठ्या प्रमाणात काजू बिया आयात केल्या जातात. या काजू कमी किमतीत मिळत असल्याने गोव्यातील काजू उत्पादकांना याचा फटका बसत आहे. सरकारने काजू आयातीबाबतचे धोरण बदलणे आवश्‍यक आहे. मात्र सरकार याबाबत गंभीर दिसत नाही.

काजू बागायतीत काम करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांचा पगार वाढलेला आहे. पण उत्पन्न कमी, वन्य प्राण्यांकडून नासाडी व दरही कमी यामुळे काजू पीक परवडत नाही. पदरमोड करूनही खर्च निघत नाही. त्यामुळे काजू बियांची दरवाढ आवश्‍यक आहे.
- रघू गावकर, सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT