Cashew Fruit  Dainik Gomantak
गोवा

Cashew Fruit: रसरशीत 'काजू बोंडू' बाजारात दाखल; जाणून घ्या दर

Cashew Fruit Goa Market: बाजारात येणाऱ्या काजू बोंडूंचे प्रमाण कमी असल्याने सध्या ६ रुपये प्रतिनग असे काजू बोंडूचे दर आहेत, तर ८ बोंडूंचा वाटा ५० रुपये असा विकण्यात येत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: रसरशीत पिकलेल्या ‘काजू बोंडूं’चा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेल्या खवय्यांसाठी खुशखबर. या मोसमातील पिकलेले काजू बोंडू आता डिचोलीच्या बाजारात दाखल झाले असून, या काजू बोंडूंना मागणीही असल्याचे दिसून येत आहे.

तूर्त बाजारात येणाऱ्या काजू बोंडूंचे प्रमाण कमी असल्याने सध्या ६ रुपये प्रतिनग असे काजू बोंडूचे दर आहेत, तर ८ बोंडूंचा वाटा ५० रुपये असा विकण्यात येत आहे. याप्रमाणे काजू बोंडूची विक्री होत आहे. या मोसमातील पहिलेच काजू बोंडू म्हटल्याबरोबर खवय्यांकडून मागणी वाढत आहे, अशी माहिती बाजारातील विक्रेत्यांकडून मिळाली आहे.

काजू बोंडू हे नैसर्गिक फळ असून, ते आरोग्यासही उपयुक्त आहे. या मोसमात उपलब्ध होणाऱ्या या फळापासून काजू फेणीही बनविली जाते. ग्रामीण भागात काजू बोंडू सहज उपलब्ध होत असतात. मात्र, शहरी भागातील जनतेला बाजारात येणाऱ्या काजू बोंडूंवरच अवलंबून राहावे लागत आहे.

काजू पीक लांबणीवर

काजू बोंडू बाजारात दाखल झाले असले, तरी यंदा मात्र काहीसा उशीर झाला आहे. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस काजू बोंडू बाजारात विक्रीस उपलब्ध होत असत. मात्र, यंदा असंतुलित हवामानामुळे काजू पीक काहीसे लांबणीवर पडले आहे. काजूच्या झाडांना नुकतीच फळधारणा होत असून, ग्रामीण भागातील काही काजूच्या झाडांवर बोंडू दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या म्हावळींगे, कुडचिरे या भागातून काजू बोंडू बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT