Cashew Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Cashew Festival Goa: अभूतपूर्व उत्साहात ‘काजू महोत्सवा’स प्रारंभ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : महोत्सव दरवर्षी नवनवीन संकल्पनांतून आयोजित करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Cashew Festival Goa आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवाच्या दृष्टिकोनातून आयोजित काजू महोत्सव नवनवीन संकल्पनांच्या अनुषंगाने दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

त्यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात काजूला जो 150 रुपये हमीभाव देण्यात आला आहे त्या तुलनेत जानेवारीपासून ज्या शेतकऱ्यांनी काजू विकले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे निर्देश कृषी खात्याला देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते कांपाल मैदान येथे आयोजित काजू महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वनमंत्री विश्‍वजीत राणे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार गणेश गावकर, वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, काजूपासून नवनवीन उत्पादने कशी तयार करता येतील हे पाहणे गरजेचे असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवाचे योगदान असेल.

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, गोवा म्हटले की काजूचा उल्लेख आपसुकच होतो. दिव्या राणे यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाची उत्तम वाटचाल सुरू आहे.

गोव्यात अनेक व्यापारी बाहेरील काजू आणून गोव्याचे उत्पादन म्हणून विकतात ते बंद होणे गरजेचे आहे.

Cashew Festival Goa

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, काजू हे केवळ फळ नाही, ती गोमंतकीयांची ओळख आहे. गोव्याला अशा काजू महोत्सवाची आवश्‍यकता असून पर्यटनाच्या अनुषंगानेदेखील काजूला चालना देणे गरजेचे आहे.

गोव्यात सन, सॅण्ड आणि सीच्या पलीकडेदेखील पर्यटन आहे. त्यासाठी येत्या काळात काजू महोत्सवाला जी काही मदत करता येईल ती करणार आहे.

कष्टकरी स्त्रियांना महोत्सव समर्पित

गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे म्हणाल्या, गोवा शासनाच्या सहयोगाने आयोजित हा पहिला काजू महोत्सव मी गोमंतकातील तमाम काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रियांना समर्पित करते.

काजू हे दुप्पट मोबदला देणारे पीक आहे. परंतु गोव्यातील काजूंना जेवढी मागणी आहे तेवढे उत्पादन होत नाही. गोव्यातील काजूच्या मागणीच्या तुलनेत 40 टक्के कमतरता आहे.

तुफान गर्दी

काजू महोत्सव हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता; परंतु या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काजूपासून बनविलेली विविध उत्पादने, निरा यांना चांगली मागणी होती. महोत्सवाचा देशी-विदेशी पर्यटकांनी आनंद लुटला.

आमचे लक्ष आहे की काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी नव-नवीन संकल्पना राबविणे गरजेचे आहे.

गोव्याच्या फेणीला जागतिक स्तरावर ओळख मिळविण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी काजूला 125 असलेला हमी भाव 150 रूपयांवर नेऊन शेतकऱ्यांना बळकटी दिल्याबद्दल मी त्यांचे अभार मानते.

- दिव्या राणे, अध्यक्ष, वन विकास महामंडळ

नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा

गोव्याला आत्मनिर्भर करण्यासाठी वन विकास महामंडळाद्वारे काजू महोत्सव ही नावीन्यपूर्ण कल्पना आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याच्या अनुषंगाने राबविली जात आहे. याही पुढे वेगवेगळे उपक्रम या महामंडळाद्वारे राबविले जावेत.

गोव्यातील काजू बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेऊन राज्याच्या विकासास हातभार लावावा.

गोव्‍यातील जंगलांना पर्यटनाच्या अनुषंगाने विकसित करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून युवा पिढी देखील यात सहभागी होईल आणि जंगलांचे संवर्धन होईल.

आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने जे-जे करता येईल ते करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

SCROLL FOR NEXT