Goa night parties  Dainik Gomantak
गोवा

Anjuna: ध्वनी प्रदूषणाबद्ल हणजुणेतील 'ला म्युझिका' कॅफेच्या मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

पोलिसांनी जप्त केली इलेक्ट्रॉनिक वाद्ये, स्पीकर

Akshay Nirmale

Anjuna: उत्तर गोव्यातील हणजुणे बीच परिसरात सातत्याने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. या पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावलेले असते. त्याचा त्रास परिसरातील, गावातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत. अशाच पद्धतीच्या एका तक्रारीतून हणजुणे येथील एका कॅफेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्याकडे याबाबत अंजुना ग्रामपंचायतीच्या तलाठ्यांनी तक्रार दिली होती. 04 जानेवारी रोजी ध्वनी प्रदुषणाबाबतची ही तक्रार दाखल करण्यात आली होती. 04 जानेवारी रोजी रात्री वागातोर येथील कॅफे ला म्युझिका या कॅफेत रात्री उशिरापर्यंत या कॅफेमध्ये जोरजोरात संगीत वाजत होते. या तक्रारीच्या आधारे अंजुना पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 15 अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला होता.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित कॅफेत जाऊन येथे संगीतासाठी वापरात येत असलेली इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि स्पीकर जप्त केले आहेत. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन यांच्या मार्गदर्शनानुसारक एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी कॅफे ला म्युझिकाच्या व्यवस्थापकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT