Michael Lobo and Joshua Dsouza in Goa Dainik Gomantak
गोवा

लोबो, जोशुआकडून आचारसंहितेचं उल्लंघन; गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाकडून मायकल लोबो,सुधीर कांदोळकर, जोशुआ डिसुझांना कारणे दाखवा नोटीस

दैनिक गोमन्तक

पणजी : निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याची प्रत मुख्य निवडणूक कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी मंत्री मायकल लोबोंसह तीन काँग्रेसचे आणि एका भाजप उमेदवाराचा समावेश आहे. (Michael Lobo and Joshua Dsouza News Updates)

निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभा घेण्यास तसेच घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा अधिक लोकांना सोबत घेऊन प्रचारास मनाई केली आहे. कोरोनासारख्या महामारीचा प्रसार रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 जारी केले आहे. कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो (Michael Lobo) तसेच साळगाव येथील काँग्रेसचे केदार नाईक हे घरोघरी प्रचार करताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व समर्थक त्यांच्यासोबत फिरत असल्याची तक्रार म्हापसा येथील भरारी पथकाकडे आली होती.

म्हापशाचे भाजपचे (BJP) उमेदवार जोशुआ डिसोझा तसेच काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर, शिवोलीत दिलायला लोबो, तसेच पेट्रिक सावियो आल्मेदा यांनीही निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली.

भाजप नेते दत्ता खोलकरही लक्ष्य

म्हापसा निर्वाचन अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले होते. मात्र, त्यांनी त्याला उत्तर न दिल्याने म्हापसा (Mapusa) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही पाठविली जाणार आहे. साळगाव मतदारसंघातील सांगोल्डा येथे साईबाबा मंदिरात महिलांची सभा घेतल्याप्रकरणी भाजप नेते दत्ता खोलकर यांच्याविरुद्ध साळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT