Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 4 वर्षांपूर्वी झोपडीत झाला खून, आरोपींना आधी आजीवन कारावास, नंतर निर्दोष सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Casaulim Murder: कासावली येथील २०२१ मधील खून प्रकरणात दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची गोवा खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कासावली येथील २०२१ मधील खून प्रकरणात दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची गोवा खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. दिनेश कुमार आणि शिवनाथ म्हाजी अशी या दोघांची नावे आहेत.

या दोघांच्या याचिकांना मान्यता देत सत्र न्यायालयाचा एप्रिल २०२४ मधील निर्णय रद्द केला. न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल अपूर्ण पुराव्यांच्या साखळीवर आधारित असल्याचे निरीक्षण नोंदवले.

२ एप्रिल २०२१ रोजी वेळसाव येथे अनिल नाईक यांच्याकडे कोळी म्हणून काम करणाऱ्या लालू सिंग याचा खून झाला होता. तक्रारदाराच्या मते, दोन्ही आरोपींनी आपल्या झोपडीत लाकडी दांडक्याने हल्ला करून लालू सिंगचा जीव घेतल्याचा आरोप होता. एप्रिल २०२४ मध्ये दक्षिण गोवा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

खंडपीठाने परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तपासताना सत्र न्यायालय ज्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिले होते, त्या ''बाह्यन्यायालयीन कबुलीजबाबा’बाबत शंका उपस्थित केली. फुलचंद मुंडा याने कबूल केले, की त्याने न्यायालयात दिलेले विधान हे मालक अनिल नाईक यांना खूष करण्यासाठी केले होते. या महत्त्वाच्या साक्षीदाराने केलेल्या या बदलामुळे आणि संभाव्य दबावाच्या कबुलीमुळे कबुलीजबाब अविश्वसनीय असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

न्‍यायालयाची काही प्रमुख निरीक्षणे

पुराव्यांची साखळी अपूर्ण : परिस्थितीजन्य पुरावे परस्परांशी जोडलेले नसल्यामुळे निष्कर्ष निघू शकत नाही.

‘बाह्यन्यायालयीन कबुलीजबाब’ संशयास्पद : सत्र न्यायालयाने ज्यावर भर दिला होता तो कबुलीजबाब सुसंगत व विश्वसनीय नाही.

मुख्य साक्षीदाराचा पलटा : फुलचंद मुंडाने कबूल केले, की त्याने दिलेले विधान हे मालकाला खूश करण्यासाठी होते; त्यामुळे जबाबाचा पाया डळमळीत.

दबावाची शक्यता : साक्ष आणि कबुलीजबाबावर बाह्य दबावाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचे खंडपीठाचे मत.

न्यायदानाच्या तत्त्वांनुसार स्पष्ट व ठोस पुरावे नसताना आरोपींना दोषी धरणे योग्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

अग्रलेख: ..दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा! दरोड्यांच्या मालिकेने 'गोव्याची शांतता' छिन्नविच्छिन्न केली आहे

Birsa Munda: भगवान बिरसा मुंडा 'मानवतेचे प्रतीक' होते, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून तवडकर यांनी जो मार्ग दाखवला तो गोवाभर पसरला आहे

Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Zuarinagar Fire: भल्या पहाटे गोदामं पेटली! झुआरीनगरात खळबळ; कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता

SCROLL FOR NEXT