Goa carnival Dainik Gomantak
गोवा

मडगावातही कार्निव्हलची धूम...

पर्यावरण जतन, जनजागृतीचा चित्ररथाद्वारे संदेश

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: ‘खा प्या मजा करा’ असा संदेश देत मडगावात कार्नव्हल मिरवणुकीचे आयोजन संपन्न झाले. या मिरवणुकीत पोलीस खात्याचा पिंक फोर्स खास आकर्षण राहिले. याबरोबरच प्राण्याचे, पर्यावरण विषय यांचे जतन,जनजागृती व संदेश देणारे चित्ररथ यांनी येथील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे ठप्प पडलेल्या दोन वर्षांच्या काळानंतर मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात सायंकाळी 4 वाजता करण्यात आली होती. या मिरवणुकीत किंग मोमो यांचा आकर्षक व पाश्‍चात्य कलाकुसरीने सजविलेला मुखवट्याचा रथ अग्रस्थानी होता . याबरोबरच पर्यावरण विषयी, वृक्ष संवर्धन, प्राण्याचे जतन करण्याविषयीचे संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते. या बरोबरच खाजेकर बंधूंचा चित्ररथ राज्यात होत असलेल्या जत्रेची, परंपरेची आठवण करून देत होता. तसेच विश्‍वस्तरावर सर्व प्रचलित असलेली पारंपरिक काजू फेणी निर्मितीची झलक दाखविणारा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाला होता. आकर्षक वेशभूषा केलेले अनेक कलाकार मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

गोव्याच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारे घोडेमोडणी, तालगडी, मांड याचे गट आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने रिझवीत होते. ही मिरवणूक दक्षिण गोवा जिल्हा न्यायालय ते फातोर्डा येथील स्टेडियमजवळ असलेल्या बोरकर सुपरस्टोर्सपर्यंत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची झुंबड उडालेली होती

कार्निव्हल मिरवणुकीत विविध विषयांवर आधारीत, जनजागृती करणारे, संदेश देणारे चित्ररथ तसेच आकर्षक वेशभूषा केलेल्या कलाकारांनी लक्ष वेधले. देशी-विदेशी पर्यटकांबरोबरच गोमंतकीयांनीही मोठ्या संख्‍येने त्‍यात सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT