Carlos Ferreira Congress MLA  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसने आदेश दिल्यास गटनेतेपद जरूर स्वीकारू

दोघे आमदार सरसावले; ॲड. फेरेरा, संकल्प आमोणकर यांची तयारी

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपद ११ जुलैपासून रिक्त असून नवीन नेता अजूनही ठरलेला नाही. गट नेतेपदाच्या शर्यतीत हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची दोन नावे समोर आली असून जबाबदारी दिल्यास ती स्वीकरण्याची तयारी दोघांनी दाखवली आहे.

सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असल्याने केंद्रीय पक्षश्रेष्ठी त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात विधिमंडळ गट नेते ठरवण्यासाठी बैठक होणार असल्याची शक्यता पक्षातील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचे कारण देऊन मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नवीन गट नेता कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती. त्यात ॲड. फेरेरा आणि आमोणकर यांची नावे पुढे आली आहेत. दोघेही पहिल्यांदा निवडून आले आहेत. आमोणकर सध्या विधिमंडळ गटाचे उपनेते असून ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्याची मागणी पक्षातील युवा नेते आणि कॅडरकडून केली जात आहे, तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ॲड. फेरेरा यांना जबाबदारी देण्याची सूचना पक्षश्रेष्ठीला दिली आहे.

काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत शिपाई म्हणून माझी ओळख आहे. पक्षाच्या कॅडरमध्ये आणि संघटनेतदेखील काम केले आहे. उद्या पक्षाने मला विधिमंडळ गट नेतेपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. पक्ष पुन्हा स्थिर करण्यासाठी कोणतीही जबाबदारी दिल्यास ती घेऊन पक्षासाठी काम करणार आहे, असं संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस पक्षाने कोणतीही जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची आपण तयारी ठेवली आहे. सध्या पक्षात बदल होत आहे. विधिमंडळ गट नेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा. मला ही जबाबदारी दिल्यास न्याय देणार आहे. ही मोठी जबाबदारी असून ती स्वीकारण्याची आपली तयारी आहे, असं ॲड. कार्लुस फेरेरा यांचं म्हणणं आहे

तर काँग्रेस गट नेतेपदासंदर्भात बैठक अजूनही प्रलंबित आहे. कारण आमच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू असल्याने केंद्रीय नेते त्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडली आहे. बैठक कधी होणार याबद्दल अद्याप काही सूचना देण्यात आलेली नाही. यापूर्वी केंद्रीय नेत्यांसोबत दिल्लीत बैठक झाली होती, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT