Carlos Ferreira  Dainik Gomantak
गोवा

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Carlos Ferreira: म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, ग्लेन टिकलोंनी माजी मुख्यमंत्र्यांसह १२ जणांविरोधात तक्रार केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Assembly Elections: मार्च २०१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सदस्यांकडून कथित पैशांचे वाटप होत असल्याचा दावा करीत माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी खोटी तक्रार केली. मात्र, ही तक्रार तथ्यहीन असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हे प्रकरण पुराव्याअभावी फेटाळले, असे हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मंगळवारी सांगितले.

म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, ग्लेन टिकलोंनी माजी मुख्यमंत्र्यांसह १२ जणांविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या दाव्यानुसार संबंधितांकडून आचारसंहितेच्या काळात लोकांना पैसे वाटप सुरू होते. असे तक्रारीत टिकलोंनी म्हटले होते. मात्र टिकलो हे घटनास्थळी त्या दिवशी हजर नव्हते. तरीही टिकलोंनी खोटी तक्रार केली, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टरित्या नमूद केले आहे. या खोट्या तक्रारीमुळे लोकांना अकारण मानसिक त्रास सहन करावा लागला.

तसेच कोर्टाच्या येरझाऱ्या माराव्या लागल्या. मुळात लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करू नये असा सल्ला देत फेरेरांनी टिकलोंच्या कृतीवर तोंडसुख घेतले. २०१२ पासून ते २९ एप्रिल २०२४ पर्यंत हे प्रकरण लांबले. यावर फेरेरांनी जोर दिला.

टिकलोंकडून लोकांची दिशाभूल

हळदोणा मार्केट कॉम्प्लेक्सवर भाष्य करताना फेरेरा म्हणाले की, मुळात ग्लेन टिकोलोंनी मार्केटच्या पुनर्बांधणीसंदर्भात कधीच तत्वतः मान्यता आणली नाही. मात्र, आपल्या कार्यकाळातच हळदोणा मार्केटच्या नूतनीकरणास तत्त्वतः मान्यता मिळाली. सध्या टिकलो यांची मानसिक संतुलन बिघडले असून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप फेरेरांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर वचक ठेवावा

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलताना फेरेरा म्हणाले की, निवडणुकीच्या काळात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. नुकताच बोडगेश्वर मंदिराला चोरांनी लक्ष्य केले. निवडणुकीवेळी लोक आपल्या गावी जातात. मुळात गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निर्देश देत पोलिसांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. कारण कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गृहमंत्र्यांची असते असेही फेरेरा म्हणाले. गृहमंत्र्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करून प्रशासन व पोलिसिंगवर लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT