Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मडगाव-कारवार हमरस्त्यावर गुळे येथे रस्त्याच्या कडेला रूतला मालवाहू ट्रक

हमरस्त्यावर चोवीस तासातील दुसरा अपघात

Akshay Nirmale

Goa Accident: मडगाव- कारवार हमरस्त्यावर चोवीस तासांच्या आत दुसरा अपघात झाला आहे. या रस्त्यावर गुळे येथे मालवाहू ट्रक उलटणे, ट्रक रस्त्याच्या कडेला रुतून बसणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. शनिवारी सकाळी केए 34 बी 4131 हा मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला रुतून बसला.

या ठिकाणी करमल घाट व करमल घाटाच्या पायथ्याशी रस्ता अरुंद आहे. त्याचप्रमाणे हल्लीच रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर हमरस्त्याला उंची प्राप्त होऊन रस्त्याच्या कडा खोल झाल्या आहेत त्यामुळे एकदा वाहनाची चाके रस्त्याच्या कडेला गेल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेला फरफटत जातात.

त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून जमिन डांबरी रस्त्याच्या समपातळीत आणण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी मडगावहून कारवारच्या दिशेने जाणारा एपी 21 टी ई 3699 हा मालवाहू ट्रक गुळे येथे करमल घाटाच्या पायथ्याशी रस्त्याच्या कडेला शेतात उलटला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT