Siolim Accident News Dainik Gomantak
गोवा

Siolim Accident: ताबा सुटला अन् गाडी थेट गरीबाच्या घरात घुसली; प्रकरण मिटविण्यासाठी घरातील मजुरांना पैशांचे आमिष

खोलीत झोपलेले प्रकाश चालवादी तसेच आकाश बेळार हे दोघे मजूर गाडीच्या धक्क्याने खोलीचे दगड अंगावर कोसळल्याने गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

Siolim Accident News: राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच अजून एक बातमी समोर आली आहे. वाडी-शिवोली येथून सेंट एन्थॉनी चर्च कडे भरधाव वेगात येत असलेल्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्ता सोडून रस्त्याशेजारी असलेल्या मजुरांच्या खोल्यांवर कोसळली.

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली, त्यामुळे खोलीत झोपलेले प्रकाश चालवादी तसेच आकाश बेळार हे दोघे मजूर गाडीच्या धक्क्याने खोलीचे दगड अंगावर कोसळल्याने गंभीर जखमी झाले.

दरम्यान, कायसुवमार्गे-वाडी येथून शिवोलीच्या दिशेने भरधांव येत इको कारगाडीचा चालक पॉल मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच अपघातानंतर मजुरांना पैशांचे आमिष दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी विनवणी करत होता असे तेथील मजुरांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी दुपारपर्यंत या अपघाताची रितसर तक्रार हणजूणच्या पोलिसांत दाखल करण्यात आली नव्हती, असे सुत्रांनी सांगितले. हणजूण-कायसुव तसेच शापोरा आणि वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बार रेस्टॉरंट तसेच नाईट क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू असतात त्यामुळे रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत शिवोलीत परतणाऱ्या अनेकांकडून याभागात अपघातांचे सत्र सुरुच असते त्यामुळे स्थानिक पोलिसांनी याभागात रात्रीची गस्त सुरू ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT