Car Fire in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात दामोदर महाविद्यालयाजवळ बर्निंग कारचा थरार

गाडीने पेट घेतल्याने लोकांमध्ये एकच गोंधळ; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगावात आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. येथील दामोदर महाविद्यालयासमोर आज शुक्रवारी संध्याकाळी एका गाडीने पेट घेतल्याने लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सदर गाडी खारेबांध येथील एका मॅकेनिककडे दिली होती. त्या गाडीला दोष काय आहेत ते पाहण्यासाठी हा मॅकेनिक गाडी घेऊन जात असता दामोदर महाविद्यालयाजवळ तिने अकस्मात पेट घेतला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले पण आगीचा बंब येइपर्यंत गाडी जळून खाक झाली

दरम्यान गोव्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला असून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यभरातील ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित राहून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन दिवस पावसाने अजिबात उसंत घेतली नव्हती. यादरम्यान वेळगे-सत्तरी इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीवर काजूचे भले मोठे झाड कोसळले आहे. तसेच कळंगुट येथील गौरावाडो इथल्या शाळेच्या शौचालयावर झाड कोसळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT