Car dashed home in Ponda Dainik Gomantak
गोवा

खांडेपारमध्ये घराला कारची जोरदार धडक

घराची एका बाजूची भिंत कोसळण्या बरोबरच मुख्य भिंतीलाही तडा गेला आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा : खांडेपार येथे काल शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारची धडक घराला बसून भिंत कोसळल्याने सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. फोंड्याहून उसगावच्या दिशेने जाणाऱ्या GA 03 H 7214 या क्रमांकाच्या भरधाव कारची धडक सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर यांच्या घराला बसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

घराची एका बाजूची भिंत कोसळण्या बरोबरच मुख्य भिंतीलाही तडा गेला आहे. त्यामुळे घराला धोका पोचला आहे. कारचालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारचालक पोलिस असल्याचे समजते. तो सुदैवाने थोडक्यात बचावला. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. तसेच दुकानातही ग्राहक असतात. पण दैव बलवतर त्यावेळी वर्दळ नव्हती तसेच भिंत कोसळली त्यावेळी खोलीत कुणी नव्हता. अन्यथा अनर्थ घडला असता. फोडा पोलिसांनी पंचनामा केला.

दरम्यान गोव्यात अपघाताचे सत्र सुरूच असून शुक्रवारी पहाटे 4 वाजता दाबोळी -चिखली राष्ट्रीय मार्गावरून वास्कोच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्याने कार नाल्यात कोसळली. यामुळे वाहनात असलेले चारजण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT