Accident in Porvorim Dainik Gomantak
गोवा

विजेच्या खांबाला धडकून कारचा अपघात

पर्वरीतील अपघातात कारमधील दोघे पर्यटक जखमी, रुग्णालयाच्या वाहनांचं नुकसान

दैनिक गोमन्तक

पणजी : पर्वरी येथे कारचा वीजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात झाला आहे. आरजी हॉस्पिटल समोर रेंट अ कार वीजेच्या खांबाला धडक देत फूटपाथवर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कारमधील जोडप्याला किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे.

पर्वरी परिसरात कारचा अपघात (Accident) पाहायला मिळाला आहे. एका विजेच्या खांबाला रेंट अ कार धडकून कारमधील दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या अपघातात कारचंही मोठं नुकसान झालं आहे. राजस्थानमधील हे पर्यटक जोडपं असून त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. या रेंट अ कारसह आरजी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या दोन वाहनांचेही नुकसान झालं आहे.

दरम्यान पणजीजवळच (Panjim) असलेल्या वेरे भागात मंगळवारी मालवाहू ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने तो एका मंदिरात घुसला. वेरे परिसरातील सरस्वती मंदिराचं या अपघातात मोठं नुकसान झालं आहे. ट्रक मंदिरात (Temple) घुसल्याने वेरे परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचंही मोठं नुकसान झालं आहे, तर मंदिराच्या एका बाजूचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. चालकालाही किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT