Panjim Accident Dainik Gomantak
गोवा

Accident : कारचालक महिलेची दुचाकीला धडक; पणजीत अपघात

कारचालक महिलेचं नियंत्रण सुटल्यामुळे समोरुन येणाऱ्या दुचाकीला ठोकरलं आहे.

आदित्य जोशी

Panjim Accident: राजधानी पणजीमध्ये सकाळीच एक अपघात पाहायला मिळाला. एका इलेक्ट्रिक कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून कारच्या दर्शनी भागाचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे. गीता बेकरीसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला असून अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली होती.

पणजीमध्ये वूडलँड शोरुमकडून गीता बेकरीकडे जाणाऱ्या मार्गावर आज शुक्रवारी सकाळीच अपघात झाला आहे. वुडलँड शोरुमकडून येणाऱ्या एका महिला कारचालकाने GA-03 Z-9492 आझाद मैदानाकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराला Ga-07 AD-1207 जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ इजा झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी लगेच घटनास्थळी दाखल झाले. अचानक दुचाकी समोर आल्यामुळे महिला कारचालक गोंधळली आणि ब्रेकऐवजी तिने एक्सलरेटर दाबल्यामुळे कारची जोरदार धडक दुचाकीला बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं असून महिला घाबरल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर काही काळ या भागात बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास पणजी पोलिसांकडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT