Accident in Ponda Dainik Gomantak
गोवा

खांडेपार येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

दुचाकीवरील दोघेजण अपघातात गंभीर जखमी, उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : खांडेपार येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

फोंड्यातील (Ponda) खांडेपार येथे शुक्रवारी एका कारची दुचाकीला जोरदार धडक बसली आहे. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे, तर कारही रस्त्यापासून दूर जात मोठं नुकसान झालं आहे. कारच्या दर्शनी भागाचंही अपघातात मोठं नुकसान झालं आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बांबोळी येथील नव्या महामार्गावर गुरुवारी रात्री दोन कारमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. अपघातात इनोव्हा कार आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक होऊन कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही कारच्या चालकांना अपघातामुळे इजा झाल्याने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचं गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून समोरुन येणाऱ्या इनोव्हाला जाऊन आदळली. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT