Car Accident in Bicholim Dainik Gomantak
गोवा

...आणि भरधाव कार थेट झाडीत घुसली!

डिचोली-साखळी हमरस्त्यावर झालेल्या अपघातात प्रवासी सुखरुप बचावले

Tukaram Sawant

डिचोली : डिचोली परिसरात कारचा अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील झाडीत घुसली, मात्र सुदैवाने कारमधील तिघेही प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. हे प्रवासी तेलंगणामधून गोवा फिरायला आल्याची माहिती आहे. (Car Accident in Bicholim News Updates)

डिचोली-साखळी (Sanquelim) हमरस्त्यावर झालेल्या अपघातात कार थेट रस्त्याशेजारील झाडीत घुसली. सुदैवाने या अपघातात हैद्राबाद येथील तीन युवक सुखरूप बचावले आहेत. त्यातच ज्याठिकाणी हा अपघात (Accident) घडला तिथे विजेचा खांब होता. विजेच्या खांबाला धडक बसली असती, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती होती.

शुक्रवारी सकाळी हा कार अपघात घडला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला. कारमधील प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. झाडीत कार घुसल्याने कारचंही किरकोळ नुकसान झालं आहे. गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा पर्यटकांचा (Tourist) ओघ सुरु झाला आहे. त्यातच अपघातांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT