Accident in Bambolim Dainik Gomantak
गोवा

बांबोळीत नव्या महामार्गावर दोन कारचा अपघात

भरधाव कारची डिव्हायडर ओलांडून समोरुन येणाऱ्या इनोव्हाला धडक

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात अपघातांचं सत्र काही थांबताना दिसत नाही. पणजीजवळच बांबोळी येथे नव्या महामार्गावर गुरुवारी रात्री दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं आहे.

बांबोळी येथील नव्या महामार्गावर गुरुवारी रात्री दोन कारमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. अपघातात इनोव्हा कार आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक होऊन कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही कारच्या चालकांना अपघातामुळे इजा झाल्याने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचं गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून समोरुन येणाऱ्या इनोव्हाला जाऊन आदळली. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान पर्वरी येथे कारचा वीजेच्या खांबाला धडकून बुधवारी भीषण अपघात झाला आहे. आरजी हॉस्पिटल समोर रेंट अ कार वीजेच्या खांबाला धडक देत फूटपाथवर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कारमधील जोडप्याला किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. राजस्थानमधील हे पर्यटक (Tourist) जोडपं असून त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. या रेंट अ कारसह आरजी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या दोन वाहनांचेही नुकसान झालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT