Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्या 35 होड्या काढल्या भंगारात

कोर्टाच्या निर्देशानंतर बंदर कप्तान विभागाची रेती उपशाविरोधात कारवाई

सुशांत कुंकळयेकर

सावर्डे : बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. त्यामुळे बंदरकप्तान विभागाने कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या एकूण पस्तीस होड्या भंगारात काढत त्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात झाली आहे. सावर्डे येथे 28 तर आमोणा नदीतून 7 होड्या जप्त करण्यात आल्या होत्या, तर रेती उपसा करणारे 5 पंप जप्त केले होते.

राज्यात बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर रेती व्यवसाय चालत असल्याने याविरोधात काही बिगर सरकारी संस्थांनी न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. सदर याचिकांची दखल घेऊन न्यायालयाने रेतीव्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून सावर्डे आणि आमोणा नदीतून 35 होड्या जप्त करून ठेवल्या होत्या. सदर होड्यांचा लिलाव करण्यात आला होता आणि आता या होड्यांची विल्हेवाट लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

संपादकीय: अहवालप्रवण प्रशासन

Indian Cricket Team: टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? खेळाडूंच्या वारंवार दुखापती अन् आता थेट राजीनामा, BCCIकडून निर्णय बाकी

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

SCROLL FOR NEXT