Cape Corporation Dainik Gomantak
गोवा

Cape Corporation : चतुर्थी गेली दु:खात; दिवाळी सुखात ; केपे पालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार होणार

केपे पालिकेकडे उत्पन्नाचे भक्कम स्रोत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देताना काही प्रमाणात अडचणी येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape Corporation : केपे पालिकेच्‍या तिजोरीत खडखडाट असल्‍याने गेले तीन महिने पालिकेच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नव्‍हते. त्‍यामुळे गणेश चतुर्थीचा सण साजरा करताना त्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

या कर्मचाऱ्यांची दिवाळी तरी सुखात जाईल का, असा सवाल करत दैनिक ‘गोमन्‍तक’ने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍याची दखल घेऊन केपे पालिकेने आज तातडीची बैठक घेत हा वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावला.

नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आज त्‍यांनी इतर नगरसेवकांसोबत बैठक घेऊन वेतनाच्‍या प्रश्‍नावर तोडगा काढला. केपे पालिकेकडे उत्पन्नाचे भक्कम स्रोत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देताना काही प्रमाणात अडचणी येतात.

पण पालिकेने वेळोवेळी त्यावर तोडगा काढून कामगारांचे वेतन दिले आहे; पण यावेळी थोडा उशीर झाल्याचे शिरवईकर यांनी मान्य केले.

आर्थिक स्रोेताचा अभाव

2014 पूर्वी ज्यांनी घरे बांधली, अशा बऱ्याच लोकांनी घर क्रमांक घेतला नसल्याने पालिकेचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे या लोकांनी घर क्रमांक घेण्यासाठी पालिकेशी संपर्क साधावा, असे दयेश नाईक यांनी सांगितले.

केपे बाजार भौगोलिकदृष्ट्या लहान असून येथे कोणतेही उद्योग-व्यवसाय तसेच आर्थिक उलाढाल होत नसल्याने पालिकेला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. यासाठी राज्य सरकारने या पालिकेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असेही नाईक म्हणाले.

सरकारने वळवले जकात शुल्क

पालिकेला लोकांकडून लाखो रुपये येणे बाकी आहे. तसेच केपे येथे एकमेव पेट्रोल पंप असून त्याद्वारे मिळणारे जकात शुल्कही सरकारने परस्पर वळवल्याने आम्हाला बराच त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेला येणे असलेले पैसे लोकांनी लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दयेश नाईक यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT