Sunburn 2022 Dainik Gomantak
गोवा

Sunburn 2022: पर्यटनमंत्री म्हणतात 'फक्त ड्रग्‍ससाठी सनबर्न रोखू शकत नाही'

सनबर्नमुळे राज्याच्या पर्यटनात मोठी वृद्धी झालेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn 2022: गोव्यात आजपासून (दि.28) तीन दिवसीय सनबर्न (Sunburn Goa 2022) हा जगप्रसिद्ध महोत्सव होत आहे. मंगळवारी वागातोर येथे महोत्सवाची सुरूवात गोवा व्हिलेज सनबर्नने झाली. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Tourism Minister Rohan Khaunte) यांनी केले. ड्रग्‍सचे एकमेव कारण पुढे करून सनबर्न रोखू शकत नाही. असे वक्तव्य खंवटे यांनी केले.

काय म्हणाले पर्यटनमंत्री रोहन खंवटे?

राज्याला चांगल्या पर्यटकांची गरज आहे. अवैध्य कृत्यांत गुंतलेल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आणि सज्ज आहे. परंतु ड्रग्‍सचे एकमेव कारण पुढे करून आपण ‘सनबर्न’सारखा महत्वाकांक्षी इव्हेंट रोखू शकत नाही. सनबर्नमुळे राज्याच्या पर्यटनात मोठी वृद्धी झालेली आहे. नवोदित कलाकारांसाठी संधी देणारा हा महोत्सव सर्व प्रकारची दक्षता घेऊन यंदा साजरा करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दरम्यान, गोव्यातील वागातोर (Vagator) किनाऱ्यावर आयोजित सनबर्न फेस्टिव्हलसह नववर्ष पूर्वसंध्येसाठीच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सज्ज आहे. रात्रीच्या संगीतरजनी, रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जची विक्री तसेच ड्रग्ज सेवन केलेल्या संशयास्पद व्यक्तींची घटनास्थळीच तपासणीसाठी किनारपट्टी परिसरात फॉरेन्सिक लॅब व अंमलीपदार्थविरोधी पथके तैनात केली आहेत. पार्ट्यांचे आयोजन केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट्सनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशारा उत्तर गोवा पोलिस (Goa Police) अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT