Candolim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Candolim: पुढील पिढीसाठी निसर्ग राखूया! बेकायदा बांधकामे, पार्ट्यांवरुन कांदोळीवासीय आक्रमक; आमदारांचा आशीर्वाद असल्याचा आरोप

Candolim Gramsabha: पुढील पिढीच्या भवितव्यासाठी येथील डोंगर आणि वनसंपदा राखून ठेवण्याची ग्रामस्थांकडून ग्रामसभेत जोरदार मागणी करण्यात आली.

Sameer Panditrao

कळंगुट: कांदोळी पंचक्रोशीत बेकायदा बांधकामे, दिल्लीश्वरांच्या बंगल्यांमधून होत असलेल्या रात्रीच्या पार्ट्या, तेथील ध्वनिप्रदूषण तसेच साळपे- ओर्डा आदी भागात खुलेआम चाललेल्या डोंगर कापणी आदी प्रश्नांवरून कांदोळीची ग्रामसभा रविवारी गाजली. ग्रामस्थांनी आक्रमकपणे संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

कांदोळी पंचायत क्षेत्रात विशेष करून साळपे, ओर्डा तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे, ध्वनिप्रदूषण तसेच डोंगर कापणीचे खुलेआम प्रकार होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून रविवारी सकाळी बोलविण्यात आलेली ग्रामसभा गाजली. स्थानिक ग्रामस्थ दामियांन फर्नांडिस यांनी तर अशा कारवायांना आमदार मायकल लोबो पाठबळ देत असल्याचा थेट आरोप केला.

यावेळी, सरपंच ब्लॅझ फर्नांडिस, उपसरपंच आमालिना डायस, पंच सदस्य निधी परब, जुआंव रॉड्रीगिझ, मॅलानी फर्नांडिस, लॅनी फियॅलो, दिनेश मोरजकर, प्युरिफिकासांव फियॅलो, लॉरेन्स फर्नांडिस, यांना फर्नांडिस तसेच पंचायत सचिव राजन गांवस उपस्थित होते. अशा कारवायांत गुंतलेल्या लोकांवर पंचायत मंडळाने कडक कारवाई करावी, अशी यावेळी मागणी करण्यात आली.

सिकेरी, बागा, हडफडे, साळगांव तसेच कांदोळीच्या परिसरात ठामपणे उभे असलेले डोंगर गावाची नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करत आहेत. त्यामुळे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी येथील डोंगर आणि वनसंपदा राखून ठेवण्याची ग्रामस्थांकडून ग्रामसभेत जोरदार मागणी करण्यात आली.

कचरा प्रकल्पातून दुर्गंधी!

पिळर्ण पठारावर उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पातून वेळोवेळी दुर्गंधी येत असल्याने परिसरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना घरांच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घरात रहावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT