म्हापसा: कांदोळी येथील २,४०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जागा विकण्याच्या बहाण्याने अंधेरी पूर्व, मुंबई येथील लक्झरीअस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी ऑस्कर वाझ, झिटा वाझ (दोघेही रा. कांदोळी), लॉरा वाझ डिसा, पीटर डिसा (दोघेही रा. म्हापसा) आणि अलॉयसिस पिटो (मुंबई) या पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
सर्व संशयितांनी मिळून मुंबईतील लक्झरीअस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड रिअल इस्टेट कंपनीला कांदोळी येथील २,४०० चौरस मीटर जागा विकण्याची तयारी दर्शविली. या जागेचे आमच्याकडे कायदेशीर अधिकार असल्याचे संशयितांनी मुंबईच्या कंपनीला सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवत कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे फिर्यादी नितन छतवाल (वय ५८ वर्षे, रा. मुंबई) यांनी पाचही जणांसोबत जागा खरेदी- विक्री व्यवहार केला. यासाठी छतवाल यांनी या पाचजणांना या व्यवहारासाठी सुमारे ८ कोटी रुपये देण्यात आले.
संशयितांना आठ कोटी रुपये मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईमधील या कंपनीला जागा रितसर सुपूर्द केली नाही. तसेच ही जागा परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला (थर्ड पार्टीला) विकली, असे फिर्यादी छतवाल यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी या पाचजणांविरुद्ध ‘भान्यासं’चे कलम ४०६, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.