Voters in Goa Election Dainik Gomantak
गोवा

खास मतदानासाठी विमान, रेल्वेने प्रवास

काणकोणमध्ये पाचशेपेक्षा जास्त मतदारांचा उमेदवारांनी उचलला भार

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोण मतदारसंघात यंदा पाचशेपेक्षा जास्त मतदार गोव्याबाहेरून मतदानासाठी आले असल्याची माहिती मिळाली. हे सर्वच मतदार काणकोण मतदारसंघातील मूळ निवासी असले तरी काम नोकरीनिमित्त ते गोव्याबाहेर बंगळुरू, मुंबई, पुणे, दिल्ली व देशाच्या अन्य भागांत राहतात. मात्र, अटीतटीच्या विधानसभा, पालिका निवडणुकीसाठी या मतदारांना खास सवलत देऊन मतदानासाठी येण्याचे निमंत्रण उमेदवार देत असतात. (Goa Election News Updates)

काहींना विमान, रेल्वेने येण्या-जाण्याच्या तिकिटाची व्यवस्थाही करण्यात येते. त्याशिवाय अन्य खर्चही दिला जातो. एकमेव चावडी केंद्रावर अशा प्रकारे 30 मतदारांना आमंत्रित करण्यात आले आणि त्यांची तितक्याच उमेदीने बडदास्तही ठेवण्यात आल्याचे चावडी येथील मतदार शंकर नाईक यांनी सांगितले. निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया संपली आहे. मात्र, निवडणूक (Election) प्रक्रियेत सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी ९ मार्चपर्यंत मतदानासाठी सवलत आहे.

निकाल लागल्यानंतरच निर्णय : फर्नांडिस

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच मतदारांच्या गाठीभेटी व चर्चा करूनच कोणाला अनुमोदन द्यायचेे याचा निर्णय घेणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याचे इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले. निवडणुकीदिवशी दुपारीच त्यांनी आपला विजय पक्का असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते.

भाजप, कॉंग्रेसकडून इजिदोरना पायघड्या

कॉंग्रेस (Congress) आणि भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील निवडून येऊ शकणाऱ्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काणकोणातील (Canacona) अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांच्याशी दोन्ही पक्षांनी संपर्क साधून सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची गळ घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT