Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: वय ओलांडले, तरी ‘भिवपाची गरज ना!’

Goa Government Job: उमेदवारांना दिलासा: 29 रोजीच्या लेखी परीक्षेस बसण्याची मुभा

दैनिक गोमन्तक

Goa Government Job: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात चार वर्षांपूर्वी 147 पदांसाठी अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांसाठी 29 सप्टेंबर रोजी लेखी व कौशल्य परीक्षा निश्र्चित करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी अर्ज केलेले व आता सरकारी नोकरेसाठीची 45 वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या काही उमेदवारांसमोर ही अडचण होती.

मात्र, ही अडचण आता दूर झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही लेखी परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली असल्याचे कळते.

उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या न्यायालयीन निर्णयाप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय अर्ज करतानाच्या वेळी विचारात घेतले जाते, लेखी परीक्षा घेतली जाते तेव्हाचे नव्हे. जर लेखी परीक्षेसाठी अधिकारीणीकडून विलंब झाला तर त्याचे नुकसान उमेदवाराला होता कामा नये, असे हे निर्णय सांगतात.

या 147 पदासाठीची जाहिरात 24 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध झाली होती. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कचेरीकडून स्पष्टीकरण मागितले व त्यांना लेखी परीक्षेसाठी वयोमर्यादेचा प्रश्र्न अडचणीचा ठरणार नाही, असे सांगण्यात आल्याचे कळते.

त्या दिवशीचे वय लक्षात घेणार !

ज्या दिवशी उमेदवाराने अर्ज केला. त्या दिवशी जे त्याचे वय होते, ते वय पूर्वलक्षी प्रभावाने आम्ही विचार घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकाऱ्याने सांगितल्याचे कळते. वयोमर्यादा ओलांडलेले मोजकेच उमेदवार असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना टपाल, ई मेल, एसएमएस व प्रत्यक्ष फोन अशा विविधा माध्यमांतून कळविले असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT