Khandepar  Dainik Gomantak
गोवा

बंधारा प्रकल्प रद्द करा अन्यथा ऐन गणेशचतुर्थीतच आंदोलन

मुर्डी-खांडेपारवासीय : 144 कलम मागे घ्या

दैनिक गोमन्तक

मुर्डी-खांडेपारवासीयांवर बंधारा प्रकल्प लादून व कलम 144 लावून सरकारकडून होत असलेल्या एसटी समाजावरील अन्यायाची स्वेच्छा दखल अनुसूचित जमातीच्या आयोगाने घेतली नाही. त्यामुळे आज सकाळी या आयोगाला निवेदन देऊन त्याची दखल घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.

आयोगाने या प्रकरणाची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. आयोगाने यासंदर्भात हस्तक्षेप करत या समाजाला न्याय न दिल्यास ऐन गणेशचतुर्थीच्या काळात आयोगाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनबरोबरच गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जाईल.

गरज भासल्यास या काळात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरही हे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रामा काणकोणकर यांनी दिला. बंधारा प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने खांडेपार भागात जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागू केला, तो मागे घ्यावा अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली.

कुर्टी - खांडेपार ग्रामसभेत बंधारा प्रकल्पाविरोधात ठराव घेऊनही सरकार तेथे सुमारे ८८ कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करत आहे. यावरून सरकारचा त्यात स्वार्थ आहे हे उघड होते. कलम १४४ लावणे म्हणजे ही सरकारची दादागिरी आहे. ऐन सणाच्या काळात जमावबंदीचा आदेश हा राज्यात पहिल्यांदाच काढण्यात आला आहे.
- विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT