seller Dainik Gomantak
गोवा

Canacona: काणकोणमध्ये गाडेवाल्यांना सतावल्यास रस्त्यावर उतरू!

पाळोळे व अन्य भागांतील स्थानिक फिरत्या गाडेवाल्यांना सरकारी बळाचा वापर करून सतावल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांना दिला.

दैनिक गोमन्तक

Canacona: पाळोळे व अन्य भागांतील स्थानिक फिरत्या गाडेवाल्यांना सरकारी बळाचा वापर करून सतावल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी जागृत काणकोणकर आणि जनसेना वॉरियर्स यांच्या शिष्टमंडळाने काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांना दिला.

काल या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक गावस यांची भेट घेतली. यात नगरसेवक धीरज नाईक गावकर, शुभम कोमरपंत, माजी नगराध्यक्ष श्‍यामसुंदर नाईक देसाई आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी नगरसेवक गावकर म्हणाले, स्थानिक गाडेधारकांना हेतूपुरस्सर सताविण्यात येत आहे. मात्र, यापुढे हे खपवून घेणार नाही. स्थानिक व्यावसायिकांना सत्ताधारी नेत्यांकडून सूड बुद्धीने त्रास दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी केला आहे. हे प्रकार न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांना घेराव

काणकोणच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाळोळे येथील स्थानिकांचे रस ऑम्लेट, फास्ट फूड गाडे बंद केले आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे. सोमवारी स्वाभिमानी जागृत काणकोणकर आणि जनसेना वॉरियर्सने मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांना या विषयावरून घेराव घातला होता

विरोधकांचा सूड बुद्धीने छळ

पाळोळे येथे फिरत्या गाडेधारकावर अन्याय करण्यात येत आहे. हा तरुण शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच आघाडीवर होता आणि विविध आंदोलनांतही सहभागी होता. दुर्दैवाने तो सत्ताधारी पक्षाचा समर्थक नसल्याने त्याला त्रास देण्यात येत आहे, असा आरोप भंडारी यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT