Canacona Light Issue Canva
गोवा

Canacona: काणकोणात विजेचा लपंडाव! भूमिगत वीजवाहिन्या घालूनही रड संपेना; उच्च दाबामुळे वीज उपकरणे निकामी

Canacona Power Outrage: काणकोणात कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या घालूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवाळीपासून दर पंधरा मिनिटांनी वीज खंडित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Light Issue

काणकोण: काणकोणात कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या घालूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवाळीपासून दर पंधरा मिनिटांनी वीज खंडित होते. काहीवेळा उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो त्यामुळे रेफ्रिजरेटर, टिव्ही यासारखी वीज उपकरणे निकामी झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

भूमिगत वीजवाहिन्या घातल्यामुळे विजेचा लपंडाव कमी होऊन अखंडित वीजपुरवठा होण्याची नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्याऐवजी खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात स्थानिक वीज अभियंत्यांना विचारले असता शेल्डे येथे वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सध्या लोलये, पैंगीण, आगोंद, खोला, गावडोंगरी, खोतीगाव या भागात वीज व जलपुरवठा खात्याची बिले भरण्याची कोणतीच सोय नसल्याने वीज व जलपुरवठा ग्राहकांना चावडी येथे येऊन बिल भरणा करावा लागत आहे, त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात उन्हाचा 'चटका' खिशालाही! लिंबू, शहाळे, कलिंगडाच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या ताजे दर..

Ponda: 'फोंडा अध्यात्मिक शहर बनवणार'! प्रचारसभेत केजरीवालांची घोषणा; पारदर्शक प्रशासन देण्याचा वायदा

Dabolim Airport: 'दाबोळी' विमानतळाची उंच भरारी! पटकावला द्वितीय क्रमांक; जागतिक क्रमवारीत मिळवले मानाचे स्थान

IFL 2026: 'धेंपो क्लब' सलग 2 पराभवांनंतर नामुष्की टाळणार? नामधारी एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर फातोर्डा येथे रंगणार सामना

Lairai Jatra: लईराई जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’! देवस्थान समिती बरखास्तीवर सरकारचे आश्वासन

SCROLL FOR NEXT