पोलिस आरोग्य केंद्र dainik gomantak
गोवा

Canacona News : काणकोणातील पोलिस, आरोग्य केंद्राच्या निवासी गाळ्यांची दुरवस्था

काणकोण पोलिस ठाण्याच्या कर्मचारी निवासी गाळे व काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासी गाळ्यांचा समावेश आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News : काणकोणातील सरकारी निवासी गाळ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात प्रामुख्याने काणकोण पोलिस ठाण्याच्या कर्मचारी निवासी गाळे व काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासी गाळ्यांचा समावेश आहे.

काणकोण पोलिस ठाण्याला लागूनच पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एकमजली निवासी गाळे पंचवीस वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. मात्र, त्यांची आजची परिस्थिती दयनीय झाली आहे.

खिडक्या, दारे यांची तावदाने तुटली आहेत. रंगरंगोटी पार निघून गेल्याने या निवासी गाळ्यांना भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निवासी गाळ्यांची दुरवस्था झाल्याने सध्या पोलिस कर्मचारी भाड्याच्या घरांत आपल्या कुटुंबासमवेत राहात आहेत.

हीच परिस्थिती काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या निवासी गाळ्यांची झाली आहे. काही निवासी गाळे पोर्तुगीजकालीन आहेत, तर काहींची उभारणी सुमारे तीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारती विभागाने त्यांची योग्य देखभाल न केल्याने ते मोडकळीस आले आहेत. तीन वर्षांमागे अशाच परिस्थितीत काही सरकारी कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. मात्र, आता सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी इतरत्र राहणे पसंत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT