काणकोण: ‘पैसे द्या, नोकरी घ्या’ या प्रकरणात गोवा पोलिसांनी पर्ये साखळी येथील रामेश्वर मांद्रेकर (वय, 33) आणि काणकोण येथील रहिवासी रवीन भंडारी यांना अटक केली आहे. काणकोण येथील एका रहिवाशाला पोलीस खात्यात भरती करून देण्याचे आश्वासन देऊन 5 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
नाईक आडनावाच्या माणसाने हा गुन्हा दाखल केला असून यापूर्वी देखील एप्रिल 2021 आणि मार्च 2024 मध्ये त्याने पोलिसांकडे यासंबंधित गुन्हा दाखल केला होता.
सध्या गोव्यात पैसे देऊन नोकरी मिळवण्याची खोटी आश्वासनं देण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत.
आयपीसीच्या कलम 420 अंतर्गत रामेश्वर मांद्रेकर याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि तक्रारीनुसार रामेश्वर मांद्रेकर याने वर्ष 2020 तो मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा ड्राइव्हर असल्याचा दावा करत, केवळ एका वर्षाच्या आत पोलीस खात्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र या कामासाठी मांद्रेकर व भंडारी यांनी नाईक या काणकोण येथील फिर्यादयाकडून 5 लाख रुपयांची मागणी केली होती. रामेश्वर मांद्रेकर याने दिलेल्या आश्वासनाच्या आधारे फिर्यादयाने त्याच्या मित्राच्या उपस्थितीत काणकोण येथे वडिलांच्या मदतीने पैसे दिले आणि दोन्ही आरोपींनी नोकरी न मिळाल्यास पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते असेही फिर्यादी नाईक म्हणाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.