Goa Railway Dainik gomantak
गोवा

Goa Railway: लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा न दिल्यास करणार ‘रेल रोको'

लांब पल्ल्याच्या रेल गाड्यांना काणकोणात थांबा न दिल्यास पंधरा दिवसानंतर रेल रोको आंदोलनाचा इशारा काणकोणमधील नागरिकांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: लांब पल्ल्याच्या रेल गाड्यांना काणकोणात थांबा न दिल्यास पंधरा दिवसानंतर रेल रोको आंदोलनाचा इशारा काल काणकोण मधील ज्येष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी दिला आहे.

काल कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी.पी.निकम यांनी काणकोणात मामलेदार कार्यालयाच्या सभागृहात मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या उपस्थितीत ‘झीरो बेस पॉलिसी’ मुळे काणकोणात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर नागरिकांनी विभागीय व्यवस्थापक निकम यांना मागणी पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली.

यावेळी कोकण रेल्वेचे ज्येष्ठ वाहतूक अधिकारी सुनील नारकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस उपस्थित होते.राजेंद्र देसाई,शांताजी नाईक गावकर,अनिल भगत, संदेश तेलेकर, नगरसेवक धीरज नाईक गावकर,बबेश बोरकर, उल्हास भाटीकर यांनी मागण्या मांडल्या. ज्येष्ठ नागरिक व समविचारी संघटनेच्या सदस्यांनी मात्र आंदोलकांनी आम्ही सार्वजनिक मालमत्तेची कोणत्याच प्रकारची हानी करणार नाही.

कोकण रेल्वेसाठी जमिनी कवडी मोलाने दिल्या. कोकण रेल्वेचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी प्रसंगी पोलिस कोठडी भोगली. त्या काणकोणवासीयांना रेल्वे थांबण्यासाठी उपोषण व आंदोलन छेडावे लागते, ही लांच्छनास्पद बाब असल्याचे ज्येष्ठ नागरिक शांताजी नाईक गावकर यांनी निकम यांना सुनावले.

राजेंद्र देसाई यांनी सांगितले,की आंदोलन व उपोषण करून रेल्वे प्रशासन व सरकारला काणकोणवासीयांच्या भावना कळत नसतील,तर रस्त्यावर उतरू. 13 जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांनी याच मागणीसाठी रेल्वे स्थानकावर उपोषण केले होते.

सभापतींच्या सूचनेकडे दुर्लक्ष

सभापती रमेश तवडकर यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना 30 एप्रिल 2022 रोजी पत्र पाठवून काणकोण रेल्वे स्थानकावर मत्स्यगंधा,नेत्रावती व गांधीधाम नागरकोयल या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची सूचना केली होती.

मात्र, रेल्वेकडून निवेदनावर काहीच निर्णय झाला नाही.हा गोवेकरांचा अपमान आहे, असे राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT