Yuri Alemao At Canacona Health Centre Dainik Gomantak
गोवा

Canacona Primary Health Centre: सुविधांअभावी 'इथे' होतेय रुग्णांची परवड; आलेमाव यांनी केली पाहणी

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना केंद्रात अनेक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्याचा उलगडा झाला

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण तालुक्यातील काही डायलिसिस रुग्णांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भेट घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्याच विनंतीवरून विरोधी पक्षनेते त्यांच्यासोबत काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तावारीस यांना भेटले.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना तेथे अनेक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्याचा उलगडा झाला.

डायलिसिस युनिटमध्ये रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या आणि तक्रारी आलेमाव यांनी ऐकून घेतल्या. डायलिसिसच्या रुग्णांना आवश्यक इंजेक्शन्स घेण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर येऊन पुन्हा दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. यासंबंधी डायलिसिस युनिटमध्येच आवश्यक ते इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात येईल, असे डॉ. तावारीस यांनी सांगितले. यावेळी रुग्णांनी या आरोग्य केंद्रातील इतर समस्याही युरी आलेमाव यांच्यासमोर मांडल्या.

युनिटचे स्थलांतर रखडले

येथील डायलिसिस युनिट हॉस्पिटलच्या बाहेरील कोविड युनिट तळमजल्यावर हलवायचे होते; परंतु वेळोवेळी वीज यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ते त्या ठिकाणी नेणे उचित होणार नाही. मात्र, हे डायलिसिस युनिट अन्यत्र हलविण्याची विनंती केली जाऊ शकते, असे डॉ. जुझे तावारीस यांनी सांगितले.

प्लंबरअभावी स्वच्छतागृहे नादुरुस्त

येथील डायलिसिस युनिटमधील स्वच्छतागृहे योग्य अवस्थेत नाहीत. ती तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले असता आरोग्य अधिकारी म्हणाले की, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्लंबर पाठवण्यास सांगितले होते; परंतु त्यांना योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, लवकरात लवकर स्वच्छतागृहे दुरुस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT