Carlos Álvares Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘गोवा फॉरवर्ड’ची सभा रोखण्याचा प्रकार आक्षेपार्ह! आमदार फेरेरा यांचे मत; पोलिसांच्या कृत्यावर नाराजी

Carlos Ferreira Goa Forward: प्रचारसभा होणार आहे, त्याची माहिती पोलिस किंवा तत्सम प्रशासकीय यंत्रणेला देणे आवश्यक आहे. तसेच सभेसाठी परवानगी घेणे गरजेचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काणकोण तालुक्यातील गावडोंगरी येथे गोवा फॉरवर्डची प्रचारसभा पोलिसांनी बंद पाडण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. पोलिसांच्या या कृत्यावर काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी आक्षेप नोंदवत तोंडसुख घेतले.

काणकोण पोलिस निरीक्षक यांनी आचारसंहिता पाहिली आहे का? त्यातील नियम काय सांगतात, हे पोलिसांना माहीत नाहीत का? असे म्हणत त्यांनी आचारसंहितेतील नियम वाचून दाखवले. यासंदर्भात फेरेरा यांनी व्हिडिओ जारी केला आहे.

प्रचारसभा होणार आहे, त्याची माहिती पोलिस किंवा तत्सम प्रशासकीय यंत्रणेला देणे आवश्यक आहे. तसेच सभेसाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय इनडोअर सभा असल्यास त्यास ध्वनी प्रदूषणाचा नियम तसेच ध्वनीयंत्रणा लावण्याची परवानगी लागत नाही. तरीही पोलिसांनी गोवा फॉरवर्डच्या प्रचार सभेत जाऊन जे कृत्य केले ते निषेधार्ह आहे, असेही त्यांनी नमूद केले.

झालेली कारवाई बेकायदेशीर!

पोलिस निरीक्षक आणि इतर पोलिसांनी ज्या पद्धतीने सभेत जाऊन ती नियमबाहय पद्धतीने बंद पाडली आहे, हे स्पष्ट दिसते. आपण त्या ठिकाणी नव्हतो, पण व्हिडिओ वरून ते स्पष्ट दिसत आहे. पोलिसांची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने त्या पोलिस निरीक्षकाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे आपण सूचवू इच्छितो. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, असे आपण त्यांना आवाहन करतो, असे फेरेरा यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अल्पवयीन रशियन मुलींकडून फुलांची विक्री, पर्यटकांसोबत फोटोसाठी आग्रह; हरमल किनाऱ्यावरील Video Viral

दिवसाढवळ्या चॉपरने केला हल्ला, 4 लाख पळवले; सबइन्स्पेक्टरने जीपमधून उडी मारून चोरांना पकडले; 33 वर्षांपूर्वी वास्कोत घडलेला थरार

Betul: महिला, माजी सरपंचांमध्ये खडाजंगी! बेतुल मोबाईल टॉवरचा विषय चिघळला; आगोंद ग्रामसभेत तणाव

Goa Live News: भाजपचे राजकारण आम्हाला मान्य नाही! कुर्टी-फोंडा मतदारसंघात मगोपचा स्वतंत्र उमेदवार: केतन भाटीकर

MGP: 'आम्ही युती धर्म पाळणार आहोत'! ढवळीकरांचे स्पष्टीकरण; उमेदवारांबद्दल म्हणााले की..' Watch Video

SCROLL FOR NEXT