मासळी मार्केट. Dainik Gomantak
गोवा

सीझेडएमपीच्या विरोधात काणकोण मासळी मार्केट बंद

बाजारात शुकशुकाट: मच्छिमारांना निराधार होण्याची भीती

दैनिक गोमन्तक

काणकोण: सीझेडएमपीच्या विरोधात काणकोणाच्या मच्छिमारानी आज (ता.4) शुक्रवारी मासळी मार्केट बंद ठेवून आंदोलन छेडले.या आराखड्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या पारंपारिक मासेमारी व्यवसायाबरोबरच त्यांच्या निवासावर गदा येणार आहे. त्यांना किनारी भागातून विस्थापित व्हावे लागेल, अशी भीती आहे. या आराखड्याचा निषेध म्हणून आज (शुक्रवारी)सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्धा दिवस मासे मार्केट बंद ठेवण्यात आले.

काणकोण मधील कोणीही मच्छिमार मासेमारीसाठी शुक्रवारी समुद्रात उतरले नाहीत, अशी माहिती क्षत्रिय पागी समाजचे अध्यक्ष अशोक धुरी यांनी दिली.आज पालिका मासळी मार्केट बंद राहिल्याने चावडी बाजारात शुकशुकाट होता. पैंगीण,श्रीस्थळ, लोलये भागातही विक्रेते आले नाहीत.

माजाळी,कारवारच्या मासे विक्रेत्यांचाही पाठिंबा

चावडी वगळता अन्य भागात माजाळी,कारवार येथून मासळी विक्रेत्या महिला मासे विक्रीसाठी येत असतात, मात्र त्यांनीही या बंदला पाठिंबा देऊन मासे विक्री केली नाही. संध्याकाळी काही प्रमाणात पालिका मासळी मार्केटात मासे विक्री करण्यात आली मात्र स्थानिक मच्छिमार आज समुद्रात मासेमारीसाठी न गेल्याने स्थानिक ताज्या मासळीचा अभाव,मासळी मार्केटात संध्याकाळी दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

खरी कुजबुज: कोण कुणाला मतदान करतो?

VIDEO: पाकड्यांच्या क्रिकेटचा खेळखंडोबा! वाऱ्याच्या एका झटक्यानं पीचवरील कव्हर्स उडाले अन् ग्राऊंड्समनही तोंडावर पडले, पाहा व्हिडिओ

Russian Military Plane Crash: संपर्क तुटला अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं! रशियाचं 'An-26' लष्करी विमान क्रिमियात कोसळलं; 29 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT