Calangute Village Panchayat  dainikgomantak
गोवा

कळंगुट ग्रामपंचायतीची पोलिसांना अवैध बांधकामे थांबवण्याची मागणी

अवैध अतिक्रमण आणि अवैध बांधकामांवर कारवाई व्हावी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: कळंगुट येथील ग्रामपंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावूनही येथील काही ठिकाणी अवैध बांधकाम सुरू आहेत. तसेच बेकायदा अतिक्रमणही करण्यात येत आहे. या अवैध अतिक्रमणांवर आणि अवैध बांधकामांवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामपंचायतीने कळंगुट पोलिसांना केली आहे.

Illegal construction latest news

सरपंच (Sarpanch) शॉन मार्टिन यांनी, कळंगुट पोलिस स्टेशनला (Calangute) (Police Station) दिलेल्या लेखी तक्रारीत, पोलिस निरीक्षकांनी राजेश चौधरी याच्यावर अवैध बांधकाम (Illegal construction) सुरू ठेवल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी केली. जेंव्हा “पंचायतीने पाहणी करून अवैध बांधकामावरून कारणे दाखवा नोटीस (Notice) बजावण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून बेकायदा बांधकाम सुरूच आहेत. हे काम उघडपणे सुरू असून या कृत्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चौधरी यांच्यामुळे गावात (village) कायदा आणि सुव्यवस्थेची (Law and order)परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, शक्यता असल्याचे सरपंच मार्टिन यांनी सांगितले.

तसेच पोलिसांना (Police) उमता वाडो येथील सर्व्हे क्रमांक 200/10 मधील काम तात्काळ थांबवण्याची विनंती केली आहे. जे बेकायदेशीरपणे (Illegal) सुरू आहे. तर हे काम थांबवण्यात पोलिस अयशस्वी झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पुढे गावाचे नाव देखील बदनाम होऊ शकते.

यावेळी सौझा लोबोच्या घटनेचा संदर्भ देताना सरपंच म्हणाले की, “कळंगुटने (Calangute) याआधीच सौझा लोबो आणि अरोरा यांच्याप्रकरणात वाडोत कायदा आणि सुव्यवस्था बिघलेली पाहिलेली आहे. त्यावेळी पोलिसांनी बेकायदेशीर काम थांबवून वेळीच हस्तक्षेप केल्याने तेथे शांतता प्रस्थापीत झाली होती.

तर उमता वाडो, येथील एका ज्येष्ठ रहिवाशाने केलेल्या तक्रारीवर कारवाई करत पंचायतीने एका चौधरीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, कारणे दाखवा नोटीसकडे दुर्लक्ष करून संबंधित व्यक्तीने अवैध अतिक्रमण सुरूच ठेवले. तर त्याने कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियम आणि नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचे तक्रारीत तक्रारीत, अर्कान्जेला डी’कोस्टा यांनी म्हटले. तर हे बांधकाम कोणतेही योग्य खबरदारी न घेता आरसीसी खांबांसह केले जाते आणि त्यामुळे सामान्य कंपाऊंड भिंतीला तडे गेले आहेत. ज्यामुळे कधीही ते कोसळून मानवी जीवनास धोका निर्माण होऊ शकतो.

तर चौधरी यांनी पाण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या (PWD) पाणीपुरवठा पाईपलाईनचेही नुकसान केले असून ते माझा छळ करत आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

SCROLL FOR NEXT