calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute Public March: डान्‍सबार, ड्रग्‍ज व्‍यवहार, वेश्‍‍या व्‍यवसाय यांविरोधात कळंगुटवासीयांचा एल्गार

Goa: कळंगुट पंचायत क्षेत्रात डान्‍सबार, ड्रग्‍ज व्‍यवहार, वेश्‍‍या व्‍यवसाय चालक असून, त्‍यामुळे सामाजिक, सांस्‍कृतिक अध:पतन होत आहे, असा दावा करत कळंगुटवासीय रविवारी एकवटले.

दैनिक गोमन्तक

Calangute Public March: कळंगुट पंचायत क्षेत्रात डान्‍सबार, ड्रग्‍ज व्‍यवहार, वेश्‍‍या व्‍यवसाय चालक असून, त्‍यामुळे सामाजिक, सांस्‍कृतिक अध:पतन होत आहे, असा दावा करत कळंगुटवासीय रविवारी एकवटले. त्‍यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी मूक मोर्चा काढला. विशेष म्‍हणजे मोर्चात आमदारही सहभागी झाले होते.

कांदोळी येथील जांभळेश्वर मंदिराकडून मोर्चाला सुरुवात झाली व बागा किनाऱ्याकडे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सरपंच जोसेफ सिक्वेराही उपस्‍थित होते.

कळंगुटमध्‍ये बेकायदा डान्‍सबार सुरू आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे पंचायतीकडे अधिकार आहेत. पंचायतीने केवळ पुढाकार घ्यायला हवा. पंचायतीने एकोपा दाखविल्यास गावातील 80 टक्के कथित डान्सबार हे आपोआप बंद होतील.

कारण स्थानिकांनीच आपल्‍या जागा ह्या जास्त भाडे मिळते, या आशेने संबंधितांना चालविण्यास दिल्‍या आहेत. डान्सबारच्‍या जागा या स्थानिकांच्‍या असून, त्यांनीच संबंधितांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्‍या आहेत.

त्यामुळे स्थानिकांना सांगून या बेकायदा गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न करुया, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यावेळी सांगितले.

आमदार लोबो म्‍हणाले

2015 मध्ये मी ‘पीडीए’ चेअरमन असताना अशा डान्सबारवर कारवाई केली होती. तेव्हा तीन डान्सबार आम्ही कायदेशीररित्या मोडले होते.

स्थानिकांनीच काहींना भाडेपट्टीवर जागा दिल्‍या असून, त्यासाठी जागा मालकास पाच ते आठ लाख रुपये भाडे मिळते. अशावेळी स्थानिकांना विश्वास घेऊन याचे गावावर सध्या होणारे कथित दुष्परिणाम संबंधितांना सांगावे लागतील.

असे केल्यास किमान सात डान्सबार हे आपोआप बंद होतील. सध्या जवळपास 14 डान्सबार बेकायदेशीरपणे सक्रिय आहेत.

दिल्लीतून फोन : सरपंच

कळंगुटमधील कथित डान्सबार बंद करणे हे माझे ध्येय आहे. गावात बेकायदा गोष्टीला कुठल्याही स्थितीत थारा मिळणार नाही. या अनधिकृत व वाईट गोष्टींना गावातून हद्दपार करण्यासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला असून त्यांना पंचायतीचा पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगत सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले,

या डान्सबारांबाबत मी आवाज उठविल्याने मला सध्या दिल्लीतून अनेक फोन येताहेत. पण माझे गावावर जिवापाड प्रेम असून कळंगुटला या वाईट गोष्टींतून मुक्त करण्यासाठी मी हे पाऊल उचलल्याचे या दिल्लीवाल्यांना ठणकावून सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT