Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कमिशनच्या वादातून दिओदिता यांचा खून; दोघा दलालांना अटक

Calangute Murder: हणजूण येथील पेट्रोल पंप परिसरात कळंगुट पोलिसांनी शिस्तबद्ध सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले

गोमन्तक डिजिटल टीम

Diodita Fernandes Murder Case

कळंगुट: नाईकावाडा-कळंगुट येथे बॅनसन अपार्टमेंटमध्ये करासवाडा-म्हापसा येथील दिओदिता फर्नांडिस यांचा शुक्रवारी गळा आवळून खून करण्यात आला होता. मालमत्ता खरेदी-विक्रीतील कमिशनच्या वादातून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघा दलालांना अटक केली.

कळंगुट पोलिसांनी या प्रकरणाचा मागोवा घेत रविवारी आकीब अमन शौकत अल्बे (मूळ रत्नागिरी) तसेच निखिल चंद्रकांत राजे (मूळ पुणे) सध्या राहणारा म्हापसा या संशयितांना ताब्यात घेतले.

दिओदिता फर्नांडिस यांचा खून खरेदी-विक्री व्यवहारातील कमिशनवरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कळंगुट पोलिस गेले दोन दिवस संशयितांच्या मागावर होते. शेवटी हणजूण येथील पेट्रोल पंप परिसरात कळंगुट पोलिसांनी शिस्तबद्ध सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

धनादेशाद्वारे हडपले पैसे

दिओदितासोबत केलेल्या अनेक मालमत्ता व्यवहारांतील कमिशनचे पैसे देण्यास त्या टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे संशयित आकीब आणि निखिल त्यांच्या मागावर होते. शुक्रवारी त्या एकट्याच कळंगुट येथे फ्लॅटवर आल्याची संधी साधून त्यांचा गळा आवळून खून केला. तसेच संशयितांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम आपल्या खात्यावर धनादेशाद्वारे जमा करून घेतले.

यापूर्वीही उडाले होते खटके

दिओदिता यांना कळंगुटमधील बॅनसन अपार्टमेंटमधील आपला फ्लॅट दुरुस्तीनंतर विक्रीस काढायचा होता. त्यामुळे त्यांचे तेथे येणे-जाणे होते. याआधीच्या अनेक प्रॉपर्टी व्यवहारात दिओदिता फर्नांडिस तसेच संशयितांचा एकमेकांशी संपर्क आला होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून त्यांच्यात अनेकदा खटके उडत असत, अशी माहिती कळंगुट पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT