Calangute Locals Stage Protest  Dainik Gomantak
गोवा

Calangute News : टाऊटस्‌कडून दमदाटी, ‘क्लब चावला’वर तक्रार

50 युवक एकवटले ः पोलिसांमुळे प्रकरण निवळले

दैनिक गोमन्तक

वेश्या व्यवसायाशी संबंधित टाऊट्स तसेच परप्रांतीय दलालांनी कळंगुटात उच्छाद मांडला असून रविवारी संध्याकाळी गावरांवाडा-कळंगुट येथे कामानिमित्त आलेल्या यज्ञेश वेंगुर्लेकर यांना येथील क्लब चावला रेस्टॉरंट या नाईट क्लबमध्ये मुली पुरविण्याचे आमिष दाखवत दलालांकडून दमदाटी करण्यात आली.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराने क्रोधित झालेल्या युवा कार्यकर्ते सनी कांदोळकर तसेच पन्नासेक तरुणांनी याबाबतीत कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच सदर क्लबवर हल्लाबोल केला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळंगुट पोलिसांनी क्लब चावला रेस्टॉरंट परिसरात धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, कितीही पोलिसी कारवाया झाल्या तरी अद्याप याभागातील नाईट क्लब तसेच त्यांच्याशी संबंधित दलालांचा सुळसुळाट आजही कायम आहे. आता पाणी डोक्यावरून गेले असून यापुढे कळंगुट गाव तसेच स्थानिकांच्या हितरक्षणासाठी स्थानिक तरुणांना रस्त्यावर उतरण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नसल्याचे दै. ‘गोमन्तक’शी बोलताना सनी कांदोळकर यांनी सांगितले.

दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यांनी कळंगुट येथील स्थानिक तरुणांच्या सोबतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन झाला प्रकार त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला.

"वेश्‍या व्यवसायाशी निगडीत दलालांची मुजोरी वाढली असून याबाबतीत सरकार तसेच स्थानिक पोलिस यंत्रणांनी गाफील राहून चालणार नाही. कळंगुट व परिसरात कडक पोलिस पहारा ठेवण्याची गरज आहे. यासंदर्भात, पोलिस महासंचालक तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक पोलिसांना तसा आदेश द्यावा."

-मायकल लोबो, आमदार-कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशात कुठेही चालणार 'डीडीएसएसवाय'! पहिले डिजिटल आरोग्य राज्य बनण्याचे गोवा सरकारचे लक्ष्य

Goa mining: 'RKB'ला 7 पैकी 3 खाण डंप; आणखी 13 डंपचा पुढील आठवड्यात होणार ई-लिलाव

Bengaluru Accident: बंगळुरुत भीषण दुर्घटना! काम करत असताना 40 फूट उंचीवरुन कोसळला भलामोठा दगड; 9 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Carapur Retaining Wall: मार्ग खुले न झाल्यास कोर्टात येण्याची याचिकाकर्त्यांना मुभा; विकसकाचा दावा हायकोर्टाने घेतला नोंदवून

Viral Video: 'हो' म्हणशील ना? 1454 फूट उंचीवर तरुणाने प्रेयसीला केलं प्रपोज; रोमँटिक क्षणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT