Chhatrapati Shivaji Maharaj statue issue Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुट शिवपुतळा प्रकरणाला नवे वळण, सरपंच सिक्वेरांची पोलिसांत धाव; शिवप्रेमी जमावाविरोधात तक्रार दाखल

जोसेफ सिक्वेरा यांनी 800 शिवप्रेमी जमावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत, कारवाईची मागणी केली आहे.

Pramod Yadav

Calangute Chhatrapati Shivaji Maharaj Statue Row: कळंगुट पंचायतीने कळंगुट-साळगाव रस्त्यावरील जंक्शनवर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासंदर्भात आदेश जारी केले, यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींनी मंगळवारी कळंगुट पंचायतीवर मोर्चा काढला. माफी मागितल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतलेल्या जमावापुढे तब्बल सहा तासानंतर अखेर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी जाहीर माफी मागितली.

दरम्यान, त्यानंतर आज जोसेफ सिक्वेरा यांनी 800 शिवप्रेमी जमावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत, कारवाईची मागणी केली आहे.

जमावाने पंचायत घराच्या आवारात दंगल माजवून दोन वाहने आणि पंचायत घराची मोडतोड केली. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी सरपंच सिक्वेरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 800 हून अधिक शिवप्रेमी जमावाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सिक्वेरा यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, गेल्या 3 जून रोजी कळंगुट-साळगाव या मार्गावरील कळंगुट पोलिस स्थानकाच्या जंक्शनवर ‘शिवस्वराज्य कळंगुट’ या संस्थेमार्फत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभारला होता.

मंगळवारी काय झाले?

कळंगुट-साळगाव रस्त्यावरील जंक्शनवर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासंदर्भात कळंगुट पंचायतीने आदेश जारी केल्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींनी कळंगुट पंचायतीवर मोर्चा काढला. तब्बल सहा तास पंचायतीच्या कार्यालयाबाहेर शिवप्रेमींनी ठिय्या मांडल्याने कळंगुट परिसरातील वातावरण तंग बनले.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचायतीसमोर येऊन शिवप्रेमींना उद्देशून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागतो. त्याचप्रमाणे पंचायतीने शिवरायांचा पुतळा हटविण्यासाठी काढलेला आदेश मागे घेतो, असे सांगत शिवप्रेमींच्या आक्रमकतेसमोर नमते घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT