Acused Arrested In Honey trap Case Dainik Gomantak
गोवा

खोट्या तक्रारीद्वारे खंडणी उकळणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; गुजरातमधील दोन महिलांसह तिघांना अटक

फिर्यादीकडून 2 लाखांची खंडणी उकळली होती

दैनिक गोमन्तक

Police Arrested Two Females From Gujarat For Honey Trapping: बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्‍यात आला आहे. या प्रकरणी गुजरातमधील दोन महिलांसह एका पुरुष साथीदाराला कळंगुट पोलिसांनी आज सोमवारी अटक केली.

त्‍यांनी फिर्यादी किरण पटेल (गुजरात) यांच्याकडून 2 लाखांची खंडणी उकळली होती. संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या महिलांनी फिर्यादीसोबत मैत्री प्रस्थापित केली व खंडणीच्या उद्देशाने त्‍यांनी फिर्यादीला बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी देत त्याच्याकडून 2 लाख रुपये घेतले.

चौकशीदरम्यान या महिलांनी आपल्या पुरुष साथीदाराचे नाव उघड केले. त्यानुसार पोलिसांनी विश्‍‍वदीप गोहिल याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

प्रकरणाचा असा झाला उलगडा

कोलवाळ पोलिस स्थानकात दि. २३ ऑगस्ट रोजी आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार अटक केलेल्यापैकी एका महिलेने दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. याच महिलेने मानवी तस्करीविरोधी पथकाकडेही अशीच तक्रार दिली होती.

पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी याप्रकरणी सखोल तपास करून गुजरातमध्ये चौकशी केली व माहिती मिळविली. यावेळी याच महिलांनी गुजरातमध्येही अशाच तक्रारी केल्‍याचे उघडकीस आले.

त्‍यातच एका व्यावसायिकाने कळंगुट पोलिसांशी संपर्क साधून दोन महिलांनी आपल्यावर बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन दोन लाख खंडणी उकळल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि या रॅकेटचा पदार्फाश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT