Goa MLA Salary Hike Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील आमदारांच्या पगारात मोठी वाढ; गृह कर्ज, वाहन खरेदीसाठी 40 लाख तर दरमहा 500 लीटर मोफत पेट्रोल

आमदारांचे वेतन, पेन्शनमध्ये वाढ करण्यासह इतर भत्ते वाढवण्यासही राज्य मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्यता दिली.

Pramod Yadav

Goa MLA Salary Hike: गोव्यातील आमदारांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशानाच्या सुरूवातीलाच आमदार दिगंबर कामत यांनी याबाबत मागणी केली होती. दरम्यान, गोवा विधानसभा सदस्य वेतन, भत्ते आणि पेन्शन कायदा 2004 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

आमदारांचे वेतन, पेन्शनमध्ये वाढ करण्यासह इतर भत्ते वाढवण्यासही राज्य मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्यता दिली.

काय झालेत बदल

गोव्यातील आमदारांना यापूर्वी दिवसाला तीन हजार रुपये मानधन मिळत होते, ते वाढवून चार हजार करण्यात आले आहे. नवीन वाहन खरेदीसाठी पूर्वी 15 लाख रुपये मिळायचे. ते आता 40 लाख रुपये करण्यात आलेले आहेत. तसेच, गृह खरेदीसाठीची रक्कम 30 लाखांवरून 40 लाख रुपये करण्यात आलेली आहे.

आमदारांच्या निवृत्त वेतनात बदल करण्यात आला असून, आमदारांना आता पहिल्या वर्षासाठी दरमहा 30 हजार रुपये आणि त्यानंतर सदस्यत्वाच्या प्रत्येक वर्षासाठी दरमहा चार हजार रुपये करण्यास तसेच याची कमाल मर्यादा 70 ह​जारवरून दोन लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

आमदारांना गोव्याबाहेर प्रवास आणि निवासासाठी यापुढे 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

आता 500 लीटर पेट्रोल मोफत

आमदारांना यापुढे प्रति महिना 500 लीटर पेट्रोल मोफत देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 300 लीटर होती. याशिवाय आमदारांना त्यांच्या कार्यालयात दोन एलडीसी आणि एक खासगी सहाय्यक असे सात कर्मचारी नेमण्यास मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी एक खासगी सचिव, एक कारकून (एलडीसी), एक शिपाई, एक चालक असे पाच कर्मचारी नेमण्यास मिळत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT