Rohan Harmalkar Dainik Gomantak
गोवा

Rohan Harmalkar: जीवे मारण्याची धमकी, मारहाण प्रकरण; 'मगो' नेत्याला एका दिवसात जामीन

Goa Crime News: म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने रोहन हरमलकर यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Pramod Yadav

Rohan Harmalkar

हणजूण: गोवा सोड अन्यथा जीवे मारु अशी धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते रोहन हरमलकर यांना अटक करुन जामीनही मंजूर करण्यात आला. हरमलकरांना हणजूण पोलिसांनी याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली दरम्यान, म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते रोहन हरमलकर, दुर्गादास मोरजकर यांनी १० ते १५ इतर लोकांसोबत एक व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. याप्रकरणी सुरेंद्र भरत सिंह कुमार (वय ५१, रा. हिस्सार, हरियाणा) यांनी हणजूण पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहन हरमलकर, दुर्गादास मोरजकर यांना हणजूण पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली होती.

म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने रोहन हरमलकर यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ३० हजार जातमुचलक्यावर हरमलकर यांना जामीन देण्यात आलाय. पण, दर दहा दिवसाला त्यांना हणजूण पोलिसांत हजेरी लावण्यास बंधनकारक करण्यात आली आहे.

हरमलकर, मोरजकर यांनी १० ते १५ इतर लोकांसोबत सुरेंद्र भरत सिंह कुमार यांना गोवा सोड नाहीतर जीवे मारु अशी धमकी दिली. तसेच, गंभीर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी हरमलकर आणि मोरजकरांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT