businessman kidnapped in ponda mastermind arrested  Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: फोंडा व्यवसायिक अपहरण प्रकरण, मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; कोल्हापूर येथून घेतले ताब्यात

Sandeep Chaudhary Abduction Case: फोंडा येथे भर दिवसा व्यवसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने एकच हल्लकल्लोळ उडाला होता. घराजवळून अज्ञातांनी व्यवसायिक संदीप चौधरी यांचे अपहरण केले होते. याचदरम्यान आता फोंडा पोलिसांनी शुक्रवारी (13 जून) मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

फोंडा: फोंडा येथे भर दिवसा व्यवसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने एकच हल्लकल्लोळ उडाला होता. घराजवळून अज्ञातांनी व्यवसायिक संदीप चौधरी यांचे अपहरण केले होते. याचदरम्यान आता फोंडा पोलिसांनी शुक्रवारी (13 जून) मोठी कारवाई केली.

मुख्य सूत्रधाराला कोल्हापूरातून घेतले ताब्यात

दरम्यान, पोलिसांनी चौधरी यांच्या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयनाथ कवळेकर आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. संदीप यांच्या अपहरणानंतर त्यांच्या कुटुंबियांनी फोंडा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास मोहीम सुरु केली होती. पोलिस आता या मुख्य सूत्रधाराला फोंड्यात (Ponda) घेऊन आले आहेत.

संदीप चौधरी यांचे अपहरण

फोंड्यातील नामांकीत भंगार व्यवसायिक संदीप चौधरी यांचे काही अज्ञातांनी अपहरण केले होते. मंगळवारी (10 जून) दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. अज्ञातांनी चारचाकी गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर संदीप यांच्या कुटुंबियांनी फोंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. मात्र आता पोलिस अपहरण प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळू लागले आहेत. पोलिस आता इतर संशयितांचाही शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT