Panjim Bus Accident Case  Dainik Gomantak
गोवा

Panjim: कालवी दुर्घटनेतील बसचालकाच्या निर्दोषत्वाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू

या अपघातात चार शालेय विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमन्तक

Panjim: कालवी नदीतील बस दुर्घटना प्रकरणातील चालक राजेश नाईक याला सत्र न्यायालयाने तांत्रिक बाबींच्या त्रुटीवरून निर्दोष ठरवलेल्या निवाड्याला आव्हान देण्याबाबत सरकारी वकील व पोलिस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

या अपघातात चार शालेय विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यावरील सुनावणीत संशयिताला निर्दोष ठरवल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी केलेल्या तपासकामाबाबत संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात माहिती मिळविली असता या निवाड्याच्या अधिकृत प्रतीसाठी सरकारी वकिलांनी अर्ज केला आहे. ती मिळताच पुढील प्रक्रिया केली जाईल. त्याची प्रत संबंधित पोलिस स्थानक प्रमखामार्फत उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना पाठविली जाईल.

पोलिस व सरकारी वकिलांच्या मतप्रदर्शनानुसार आव्हान देण्यासाठी ती अभियोग संचालकांकडे त्यांच्या मतांसाठी जाणार आहे. त्यांनी त्यास मंजुरी देताच उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

तत्कालीन न्यायदंडाधिकारी मिहीर वर्धन यांनी बसचालक राजेश नाईक याची फौजदारी प्रक्रिया संहितेखाली कलम 64(4) नुसार जबानी नोंद करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली पूर्तता पूर्ण केली नाही. बसला ब्रेक होते, की नव्हते तसेच जर होते, तर ते कार्यरत होते का? याचा ठोस पुरावा आरटीओ अधिकाऱ्यांनी बसची तपासणी करताना न्यायालयातील उलटतपासणीवेळी सादर करू शकले नाहीत.

तपासातील गंभीर त्रुटी आणि काही साक्षीदारांच्या विरोधाभासी विधानांमुळे कारोना जेटीजवळ कालवी नदीत बस जाऊन झालेल्या दुर्घटनेच्या आरोपातून सत्र न्यायालयाने बसचालकाला निर्दोष ठरवले होते. त्याला निर्दोष ठरविल्यानंतर मृत्यू झालेल्या कुटुंबीयांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT