Mormugao Crime News Dainik gomantak
गोवा

मुरगावमध्ये घरफोडून चोरी, संशयिताला अटक

चोरीची माहिती मिळताच मुरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली व संशयिताला ताब्यात घेतले

दैनिक गोमन्तक

सडा मुरगाव येथील एल्टन फर्नांडिस यांच्या घरातील 20 हजार रुपयांची सामग्री चोरी केल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी 19 वर्षीय विनायक राणे या संशयिताला अटक केली आहे. घराच्या बाल्कनीचा दरवाजा फोडून संशयिताने घरातील विविध साहित्याची चोरी केल्याची तक्रार रविवारी दुपारी एल्टन यांनी पोलीस स्थानकावर नोंद केली. त्यानंतर मुरगाव पोलिसांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेऊन त्यानंतर त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जानेवारी सकाळी 10 ते 30 जानेवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान चोरीचा प्रकार घडला. सडा एमपीटी कॉलनी वसाहतीत राहणाऱ्या एल्टन यांनी रविवारी दुपारी 1.30 च्या सुमारास मुरगाव (Mormugao) पोलीस स्थानकावर त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती.

एल्टन याच्या घरातून चोरट्यांने एलईडी टीव्ही, टॉर्च, 10 ग्रॅम चांदीचे एक नाणे आणि इत्यादी मिळून 20 हजार रुपयांची सामग्री चोरल्याची माहिती तक्रारीत नमूद केली आहे. चोरीची माहिती मिळताच मुरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली व संशयितालाताब्यात घेतले. मुरगाव पोलीस (police) स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT