सासष्टी: बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाला युरोपियन बालचित्रपट असोसिएशनने मान्यता दिली आहे. गोव्यातील या बालचित्रपट महोत्सवाचे महत्त्व केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले असल्याची माहिती बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाचे संचालक बिपीन खेडेकर व सिद्धेश नाईक यांनी दिली.
मडगावच्या रवींद्र भवनात उद्यापासून दुसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाला सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर युरोपियन बालचित्रपट असोसिएशनकडून मिळालेली ही मान्यता प्रेरणादायी असल्याचे खेडेकर म्हणाले. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या बालचित्रपट महोत्सवाला चांगले यश मिळाले होते. त्यावेळी २६ देशांतील १३५ चित्रपट दाखविण्यात आले व २२ हजार ५०० पेक्षा जास्त मुलांनी उपस्थिती लावली होती.
यंदा हा महोत्सव माहिती-प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित करण्यात येत असला तरी आमचे संपूर्ण सहकार्य लाभणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. यंदाही जास्तीत जास्त मुलांचा सहभाग असेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदा ३२ देशांतील ६६ चित्रपट व लघुपट महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. एकूण आठ ज्युरींची निवड करण्यात आली आहे. त्यात एंगी फ्रिस्का (इंडोनेशियन सिनेमॅटोग्राफर), सेलिन लूप (बेल्जियन), गौतम किशन चंदानी (भारतीय), जोसेफ आरबियोल (स्पॅनिश शिक्षणतज्ज्ञ), मधू चोप्रा (भारतीय) गीतांजली राव (सिनेनिर्माती), कुर्त वान डेर बाश (स्टोरीबोर्ड कलाकार), थोम पालमेन (कला दिग्दर्शक) यांचा समावेश आहे.
‘हॉट-स्पॉट ऑफ इंडिया’ या मान्यतेमुळे हा बालचित्रपट देशातील एक प्रमुख महोत्सव होणार आहे. जागतिक स्तरावरही त्याचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होणार आहे.बिपीन खेडेकर, संचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.