Bulbul Childrens International Film Festival Canva
गोवा

Bulbul Film Festival: ‘बुलबुल’ चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद! पाच हजार विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

Bulbul International Childrens Film Festival: माहिती व प्रसिद्ध खात्याने रवींद्र भवनात आयोजित केलेल्या दुसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: माहिती व प्रसिद्ध खात्याने मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित केलेल्या पाच दिवसीय दुसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज दुसऱ्या दिवशी जवळजवळ २५ शाळांतील पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महोत्सवाचा आनंद लुटला.

रवींद्र भवनाचे मुख्य सभागृह, परिषद सभागृह व ब्लॅक बॉक्स अशा तीन ठिकाणी तीन स्क्रीन्‍सवर चित्रपट व लघुपट दाखविले जात आहेत. आज मंगळवारी तिन्‍ही सभागृहांत चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. शिवाय डोम प्लेनिटोरियम, फोटो गॅलरी, नेल आर्ट, डॉट मंडाला, क्विलिंग व पॉटरी यामध्ये सहभागी होऊन त्याचाही आनंद लुटला.

या चित्रपट महोत्सवाचे आयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले असल्‍याचे जकार्ता येथून आलेली ज्युरी अँगी फ्रिस्का यांनी सांगितले. फ्रिस्का या इंडोनेशियातील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर व दिग्दर्शक आहेत. तर, वॅलेन्सिया-स्पेन येथून ज्युरी म्हणून आलेले नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ, सांस्कृतिक व्यवस्थापक व ऑडिओ व्हिज्युअल दिग्दर्शक जोसेफ आरबियोल यांनीही मुलांच्‍या प्रतिसादाबद्दल समाधान व्‍यक्त केले.

मुग्धा-प्रथमेशने रिझविले

मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांच्या सांगीतिक कार्यक्रमाने उपस्‍थित मुले, पालक व संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. त्‍यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून वाहव्‍वा मिळविली. गीत सादरीकरणाबरोबरच त्यांनी गायन क्षेत्रातील आपल्या वाटचालीबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. त्‍यांचे उत्‍स्‍फूर्त स्‍वागत करण्‍यात आले.

या बालचित्रपट महोत्‍सवाला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून मला खूप आनंद होत आहे. चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन मुलांना निश्र्चितच चित्रपटांबद्दल भरपूर माहिती मिळेल.
जोसेफ आरबियोल (ज्‍युरी-स्‍पेन)
या बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले आहे. मुलांचाही त्‍यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे महोत्‍सव दरवर्षी झाले तर मुलांची त्‍याबद्दलची जिज्ञासा वाढेल.
अँगी फ्रिस्का (ज्युरी-इंडोनेशिया)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रावणी पावसात ‘उटा’चे इंद्रधनुष्य; ‘एकीचे बळ’समोर आडकाठींची हार

Mathematics Teaching Methods: गणिताची भीती दूर करा, विद्यार्थ्यांना आकड्यांच्या सौंदर्याची ओळख करून द्या

IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान महामुकाबला; 19 ऑगस्टला रंगणार थरार, सामना LIVE कुठे पाहता येणार?

Sanjivani Sugar Factory: साखरेच्या गोडीमागची कडू कहाणी; 7 वर्षांपासून बंद ‘संजीवनी’ला मिळणार का नवजीवन?

Crime News: लिव्ह-इन पार्टनरचा गळा चिरला, मृतदेह 18 तास घरात ठेवला अन् नंतर घाटात फेकून दिला, गर्लफ्रेंडसह दोघांना बेड्या; 15 वर्षांच्या नात्याचा थरारक शेवट!

SCROLL FOR NEXT