Court |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: धनादेश न वटल्याप्रकरणी मोनी यांना सहा महिन्यांचा कारावास

धनादेश न वटल्याप्रकरणी प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक व्यंकटेश प्रभू मोनी यांना सहा महिन्यांचा सश्रम कारावास न्यायालयाकडून सुनावण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa News: धनादेश न वटल्याप्रकरणी प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक व्यंकटेश प्रभू मोनी यांना सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि तक्रारदाराला 2.14 कोटी रुपये मोबदला द्यावा, तसेच ही रक्कम देण्यास विलंब केल्यास तुरुंगवासाचा कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात येईल, असा निवाडा उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल दिला.

या प्रकरणात शहाजानंद इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.चे संचालक रसिकलाल गंगानी यांनी म्हापसा येथील सत्र न्यायालयात प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक व्यंकटेश प्रभू मोनी हे आपले 2.14 कोटी रुपये देत नसल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांना समोरासमोर आणले असता, प्रभू मोनी यांनी आपण गंगानी यांना 2.14 कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. परंतु मोनी यांनी गंगानी यांना दिलेला धनादेश न वटल्यामुळे गंगानी यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका केली होती.

न्यायालयाने दोन्ही पक्षांचे दावे ऐकल्यानंतर मोनी यांना ही शिक्षा सुनावली. मोनी यांनी या निवाड्याला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निवाडा उचलून धरला.

यापूर्वीही बंगला जप्तीची कारवाई

साल्वादोर दु मुंद येथील प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक बिल्डर व्यंकटेश प्रभू मोनी यांचा दोनमजली बंगला कर्ज न फेडल्याने बार्देशचे मामलेदार दशरथ गावस यांनी जप्त केला होता. बंगल्याचा ताबा कॅनरा बँकेला देण्यात आला होता.

बार्देश मामलेदारांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी सिक्युरिटीज ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2003 अंतर्गत मोनी यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

Best Wedding Destination: निसर्गरम्य किनारे अन् रोमँटिक वातावरणाची जादू... गोव्याला 'सर्वोत्तम विवाह स्थळ' पुरस्कार, दिल्लीतील प्रदर्शनात सन्मान

Goa Mercedes Crash: आधी वडिलांना शिवीगाळ करत मारहाण, नंतर जीवघेणा अपघात; चालक विद्याधर प्रभूचा मर्सिडीज 'कार'नामा

SCROLL FOR NEXT